सालई बु. येथे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा सत्कार सोहळा संपन्न -आमदार राजू मानिकरावजी कारेमोरे
🙏 भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱मो.नं.9373472847📞
भंडारा : ( मोहाडी ) भंडारा जिल्हा मोहाडी तालुक्यातील मौजा सालई बुज. येथे निवडून आलेले सरपंच,उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार सोहळा व ग्राम वासीयांकरीता आनंदाचा स्नेह भोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित मा.श्री.आमदार राजू मानिकरावजी कारेमोरे तुमसर मोहाड़ी विधानसभा क्षेत्र तसेच,मा.श्री.रमेश पारधी शिक्षण व आरोग्य सभापती जि.प.भंडारा, मोहाड़ी पंचायत समिती चे सभापती रितेश वासनिक तसेच श्री. देवाजी ईलमे जि.प.सदस्य भंडारा,तसेच भंडारा जिल्हा डॉक्टर सेल चे अध्यक्ष :- डॉ. निम्बार्ते साहेब, दिनेश गायधने, निखिल गायधने, सकिल अम्बागड़े, नरेंद्र साकुरे, तसेच सालई बु. येथील नवनिर्वाचित सरपंच सौ.कविताताई बांडेबुचे, उपसरपंच कृष्णा वनवे, तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, उपस्थित होते. त्यावेळी नवनिर्वाचित सरपंच सौ. कविताताई बांडेबुचे यांचा वाढदिवस सुद्धा साजरा करण्यात आले. व त्यांना दिर्घ आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आले. त्यावेळी उपस्थित समस्त ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.