ॲग्री स्टॅक मुळे शेतकऱ्यांना संपूर्ण योजनेच्या लाभ मिळणार – तहसीलदार संदीप पानमंद
जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही प्रतिनिधी –
मो. 8806689909
सिंदेवाही :- ॲग्री स्टॅक या योजनेमुळे पात्र असलेल्या शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे. या योजनेची सुरुवात 16 डिसेंबर 2024 पासून होणार असून प्रत्येक गावात या संबंधीत शिबिर राबवले जाणार आहेत. या योजनेमुळे पुन्हा शेतकऱ्यांना केवायसी करायची गरज नाही. ॲग्री स्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक कर्ज, पीएम किसान योजना आणि पीक विमा सह सर्व सहकारी योजनांचा अत्यंत सोप्या आणि सुलभ पद्धतीने लाभ मिळणार आहे. ॲग्री स्टॅक या योजना कार्यक्रमात खसरा, खतौणी या शेतकऱ्यांच्या नोंदी त्यांच्या आधार कार्डशी जोडल्या जाणार आहेत. याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे. त्यामुळे सरकारी योजनांसाठी पुन्हा पुन्हा शेतकऱ्यांना केवायसी करायची गरज नाही. एका केवायसी वर संपूर्ण योजनांचा लाभ मिळणार आहे. असे आव्हान करण्यात येत आहे की ,तालुक्यातील शेतकऱ्यांनी ॲग्री स्टॅक मोबाईल ॲप मध्ये या योजनेच्या लाभ घेण्यासाठी संबंधित गावातील तलाठी, ग्रामसेवक ,कृषी सहाय्यक, यांच्याकडून नोंदणी करून घेण्यात यावी,
अशी माहिती सिंदेवाही तहसीलदार संदीप पानमंद यांनी दिली आहे.
ॲग्री स्टॅक या योजना संबंधित तहसीलदार पानमंद, नायब तहसीलदार तुमराम, तलाठी कन्नाके वय इतर कृषी अधिकारी यांनी माहिती देत
दि.13डिसेंबर शुक्रवार रोजी सिंदेवाही तहसील कार्यालय सभागृहात बैठक घेतले होती त्यामध्ये सिंदेवाही तालुक्यातील गावातील तलाठी, ग्रामसेवक ,कृषी सहाय्यक तसेच महसूलचे कर्मचारी यावेळेस उपस्थितत होते.यावेळेस उपस्थित संबंधित अधिकार्यांचे आभार मंगेश तुमराम नायब तहसीलदार यांनी मानले