Colombo: India’s Virat Kohli plays a shot against Sri Lanka during the 4th ODI match in Colombo, Sri Lanka, on Thursday. PTI Photo by Manvender Vashist (PTI8_31_2017_000176A) *** Local Caption ***

मिडीया वार्ता न्यूज

सेंच्युरियॉन : गोलंदाजांनी सुरेख कामगिरी केली, पण फलंदाजांनी मात्र मान खाली घालायला लावली, अशा शब्दांत कर्णधार विराट कोहलीने दुसºया कसोटी सामन्याच्या पराभवास प्रमुख फलंदाजांना जबाबदार धरले. टीम इंडियाने दुसºया कसोटीसह फ्रीडम मालिकाही गमावली. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाच्या कर्णधाराने सांगितले, पहिल्या डावात चांगली भागीदारी न झाल्यामुळे संघाला यजमानांवर आघाडी घेता आली नाही. त्याने असेही सांगितले, आम्ही प्रयत्न केले पण आमची कामगिरी विशेषकरून क्षेत्ररक्षणात सुमार होती. याउलट दक्षिण आफ्रिकेचे क्षेत्ररक्षण होते आणि त्यामुळेच तो संघ विजयी झाला.

 

पहिल्या डावात एकाकी झुंज देत १५३ धावा करणाºया कोहलीने कबुली दिली की, आम्हाला वाटले खेळपट्टी ठणठणीत असेल. नाणेफेकीच्या आधी मी सहकाºयांना सांगितले की, खेळपट्टी जशी दिसते तशी ती मला वाटत नाही. पहिल्या डावात जेव्हा दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू झटपट बाद झाले तेव्हा आम्ही परिस्थितीचा लाभ उठवायला हवा होता. संघ पराभूत झाल्याने स्वत:च्या १५३ धावांच्या खेळीचे महत्त्व काहीच नाही, असे त्याला वाटते. त्याच्या मते भारतीय संघ जिंकला असता तर फलंदाजाने केलेल्या ३० धावाही मोलाच्या वाटल्या असत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here