मिडीया वार्ता न्यूज

कंगना राणावत सध्या मनालीमध्ये बनत असलेल्या आपल्या आलिशान घरात वेळ घालवत आहे. बॉलिवूडच्या क्वीनच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाले, तर ती सध्या मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसीच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या चित्रपटासाठी मेहनत करताना कंगना कोणतीही कसर सोडत नाही. आता या चित्रपटानंतर कंगना काय करणार? असा प्रश्न पडला असेल तर कंगनाच्या बॅगमध्ये बड्या चित्रपटांचा खजिना दडलेला आहे.

कंगना अमिताभ बच्चनबरोबर काम करणार आहे. या आगामी प्रोजेक्टमध्ये तिची भूमिकादेखील खूप दमदार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटामध्ये ती शारीरिकरीत्या सक्षम नसलेल्या मुलीची भूमिका साकारणार आहे. या वृत्तात कितपत तथ्य आहे, हे तर येणारा काळच ठरवेल, परंतु मोठ्या पडद्यावर बिग बी व कंगना राणावत यांना एकत्र पाहणे खूपच मनोरंजक ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here