भारतीय युवा संस्कार परीषदेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता समारोह, चाफ्यांची फुले कोमिजली तरी सुगंध मात्र दरवळतो – प्रा. वसंत गिरी, मेहकर.

66

भारतीय युवा संस्कार परीषदेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता समारोह, चाफ्यांची फुले कोमिजली तरी सुगंध मात्र दरवळतो – प्रा. वसंत गिरी, मेहकर.

मुकेश चौधरी प्रतिनिधि

हिंगणघाट :- 21 वे शतक हे भारतीय युवकांचे प्रतिभा दाखविण्याचे शतक असेल असे स्वामी विवेकानंद यांनी त्यावेळी केलेली भविष्यवाणी आज खरी ठरवायची असेल तर १८५७ पासून तर १९४७ पर्यन्तचा ईतिहास आपणास समजवून घेतला पाहिजे तो कालखंड युवा पिढीला समजला तरचं देशभक्ति, राष्ट्रप्रेम व आत्मनिर्भर भारत तर होईल त्या दिशेने आपली वाटचाल प्रगतीचे शिखर पादक्रांत करत जाईल हा झाँशीचे राणी लक्ष्मीबाई त्यानंतर चाफेकर बंधूची देशसेवा कशी असते याचा उलघडा करीत राष्ट्र गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी “वंदेमातरम्” गीत हे किती उपयोगी सिद्ध होते. तर बकिम चंद्र बोस यांची क्रांतीकारांची भुमिका कशी असायला पाहिजे याचे जीवंत उदाहरण म्हणजे चाफ्यांची फुले कोमिजली तरी सुगंध मात्र दरवळत राहला तो मार्मिक प्रसंग डोळ्यासमोर आणतांना श्रोत्यांच्या भावना सुध्दा अनावर झाल्या होत्या.ते चाफेकर बंधूंपासून तर १९४२ मधील महात्मा गांधी यांच्या असहकार आंदोलन, “करो या मरो या” इंग्रजो भारत छोडो ही क्रांतिकारक महंता सांगित वीर भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुखदेव, राजगुरू, लाला लचपत राय,अशपाक उल्ला खान, वि.दा.सावरकर, पाडुरंगजी खानखोजे यांचे द्वारा केलेला राष्ट्र भक्ती गदर, मदनलाल धिग्राचे कर्जन वायली हत्या तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिन्द सेनेचा प्रभाव हाच ख-या स्वातंत्र्याचा सिंहमोल वाटा ठरतो. हा प्रेरणादायी भाव राजमाता आई जिजाऊ यांच्या तल्लख मातृत्वाचा आशिर्वादपर दाखला होता यामुळेच आपले राष्ट्र अनेकानेक आक्रमण झेलून सुध्दा एकसंघ होता असे प्रतिपादन भारतीय युवा संस्कार परीषद व भारतीय बहुउद्देशिय युवा संस्कार मंडळ, द्वारा मातोश्री आशाताई कुणावार महिला महाविद्यालय, नंदोरी रोड,हिंगणघाट येथील आयोजित राजमाता आई जिजाऊ तथा स्वामी विवेकानंद यांच्या जयंती “राष्ट्रीय युवा संकल्प दिनाचे निमित्त” व्याख्यानमाला प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. वसंत गिरी,मेहकर यांनी व्यक्त करतांना सांगतिले. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आ. समीर कुणावार म्हणाले कि आजची तरुणाई ही वाट भटकत असून तीला पुर्व इतिहास माहित झाला तर हे युवा शक्ति अधिक तेजोमय तथा संशोधक म्हणून ओतप्रोत राष्ट्र आत्मनिर्भर करण्यात मोलाची कामगिरी बजावेल अशी आशामय भावना व्यक्त करीत परिषदेच्या ह्या व्याख्यानमालेचे कौतुक करतांना निरंतर २६ वर्षापासून सुरु असलेल्या या वैचारिक यज्ञाला शुभेच्छा व्यक्त केल्या.

व्याख्यानमालेची सुरुवात भारतमाता, राजमाता आई जिजाऊ, स्वामी विवेकानंद तथा स्व. रमेशकुमार गोयनका यांचे प्रतिमेचे पुजन करुन दीपप्रज्वलनाने प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ह्या रौप्य महोत्सवी वर्ष समारोह तथा युवा संकल्प दिनाचे सुरुवात करण्यात आली, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खा.सुरेश वाघमारे, तर प्रमुख अतिथि नगराध्यक्ष प्रेम बसंतांनी, रुग्णमित्र गजानन कुबडे, परीषदेच्या संरक्षक डाँ. प्रा. उषाताई साजापुरकर,केन्द्रीयध्यक्ष प्रा.डाँ. शरद कुहीकर,संस्थेचे सचिव प्रदीपकुमार नागपुरकर तर मातोश्री महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाँ. उमेश तुळसकर आदी मान्यवर मंचावर होते. कार्यक्रमाची भुमिका व प्रास्ताविक डाँ.प्रा. शरद कुहीकर यांनी केले, प्रमुखांचे पुष्पगुच्छ तथा परीषदेचे मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. समोर बोलतांना गिरी म्हणाले की, आजची तरुणाई चंगळवाद, भोगवाद, स्वार्थी रसात बुडाली असून त्यास त्यागाचे महत्व धीर, गंभीरता, संयम, सातत्य, ह्या बाबी शिकवायला आजच्या मातेने आई जिजाऊ होण्याची गरज आहे तर पित्यांनी शिवचरित्र आदर्शवत पुरुषार्थ मुलासमोर ठेवता आला तरचं आपण सुरक्षित राहू नाही तर परत मानसिक गुलामी ओढवून राष्ट्र रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही यासाठी थोर पुरुषांचे, क्रांतिकारी विचारातून आत्मबोध घेता आला पाहिजे पळणारी नव्हे तर धावून येणारी माणसं निर्माण झाली तर हा देश अधिक विवेकपूर्ण बलशाली होऊ शकतो असे उद्बोधन त्यांनी केले. सुत्रसंचालन कु.ईश्वरी मोहन बगमारे हिने केले, आभार प्रदर्शन डाँ. प्रा. उमेश तुळसकर यांनी मानले.तर वंदेमातरम् गीत गजानन नांदुरकर यांनी गायिले. कार्यक्रमाला पं.समितीचे माजी सभापति वासुदेवराव गौळकार, विजय बाकरे,उद्योजक रविन्द्र गोयनका, स्पंदन वस्तिगृहाचे प्राचार्य काशिनाथ लोणारे, गायत्री परिवाराचे ताराबाई बगमारे,माता मंदीर अध्यक्ष गणपत गाडेकर, डाँ. शरद मद्दलवार, अँड.विजय ढेकले, जेष्ठ्य नागरिक वासुदेवराव वाटेकर, पत्रकार मंडळी यासह शहरातील गणमान्यजन, प्राध्यापक व विद्यार्थां बंधू-भगिनी मोठ्या संख्येने प्रामुख्याने उपस्थित होते. ह्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता संयोजक चेतन काळे, कु. अरुधंति बगमारे, कु.कावेरी नायक, कु.पल्लवी वांढरे, भुषण ढोक, सुरज फुलझेले, रामभाऊ बावणे, माधव वाडकर, अमित रेंढे, धर्मेंद्र ढगे, सौ.संतोषी ढगे, केशव तितरे, नरेंद्र हाडके, रुपेश लाजुरकर,आशिष भोयर, संकेत खैरकार, कु. मंजुषा नायक,मायाताई ढगे, गौरव बगमारे, पलक गेडेकार, श्रेया घरत, इत्यादीनी अथक परीश्रम घेतले.