पुण्यात, डावखुरी असल्याने विवाहितेचा छळ.

65

पुण्यात, डावखुरी असल्याने विवाहितेचा छळ.

पुणे :- विवाहानंतर त्यांना आपली पत्नी डावखुरी असल्याचे समजले. त्यावरुन त्याने व त्याच्या आईने विवाहितेचा छळ करण्यास सुरुवात केली. तिला उजव्या हाताने काम करण्याचे असा दम देऊन शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्नीच्या फिर्यादीनंतर वानवडी पोलिसांनी पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचा विवाह गेल्या वर्षी 27 फेब्रुवारी रोजी झाला होता. त्यानंतर ती शेवाळवाडी फाटा येथे पतीच्या घरी आली. पती व सासूला ती डावखुरी असल्याचे समजले. त्यांनी तू डावखोरी आहे, असे म्हणून उजव्या हाताने काम करायचे आहे, असे दम भरुन मानसिक व शारीरीक त्रास दिला. तसेच पतीने तुझ्या वडिलांकडून 2 लाख रुपये घेऊन ये. नाही तर घटस्फोट देईल, असे म्हणून मारहाण केली. तसेच पतीने तिच्याशी संबंध ठेवले नाही. फिर्यादीच्या मोबाईलवर अश्लिल मेसेज केले. पोलीस उपनिरीक्षक पंढरकर अधिक तपास करीत आहेत.