नागपूर ग्रामपंचायत निवडणुक चंद्रशेखर बावनकुळेंचे प्रस्थ कायम, कोराडीत भाजपचा विजयी चौकार.

युवराज मेश्राम

नागपूर :- नागपुरातील कोराडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गटाने विजय प्राप्त केला आहे. या गटाने एकूण 17 पैकी 15 जागांवर विजय मिळवत येथील कोरोडी ग्रामपंचतवर भाजपचा झेंडा फडकवला आहे.

राज्यात एकूण 12,711 ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी सुरु आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मतमोजणी होत असली तरी नागपुरात भाजपचा चेहरा असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रस्थ असेलेल्या गावांच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या पर्श्वभूमीवर सलग तीन वेळा सत्तेची चव चाखणारा भाजप यंदा कोराडीत आपला गड राखू शकणार का ?, याचीच चर्चा सर्वत्र रंगली होती.

महाविकास आघाडीकडे 7 ग्रामपंचायती

मात्र, यावेळीदेखील कोरडी येथे भाजप समर्थित आदर्श ग्राम विकास आघाडीने चौथ्यांदा सत्ता काबीज केली असून येथे 17 पैकी भाजपचे तब्बल 15 उमेदवार निवडून आले आहेत. येथे चंद्रशेखर यांच्या समर्थकांनी गड राखत भाजपचं अस्तित्व टिकवून ठेवल्याचं म्हटलं जात आहे. तर महाविकास आघाडी प्रणित परिवर्तन पॅनलला फक्त 2 जागांवर विजय मिळवता आला आहे. नागपुरात इतर ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी सुरु असून आतापर्यंत महाविकास आघीडीने 7 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here