म्हसळ्यात परप्रांतीय व्यावसायिक जोरात सामान्य जनतेची होतेय फसवणूक..मनसे म्हसळा तालुका अध्यक्ष सौरभ गोरेगावकर आक्रमक

65

म्हसळ्यात परप्रांतीय व्यावसायिक जोरात सामान्य जनतेची होतेय फसवणूक..मनसे म्हसळा तालुका अध्यक्ष सौरभ गोरेगावकर आक्रमक

म्हसळ्यात परप्रांतीय व्यावसायिक जोरात सामान्य जनतेची होतेय फसवणूक..मनसे म्हसळा तालुका अध्यक्ष सौरभ गोरेगावकर आक्रमक

नंदकुमार चांदोरकर
माणगाव तालुका प्रतिनिधी
8983248048

माणगाव : म्हसळा तालुक्यात गेली काही दिवस कोणत्या ना कोणत्या निमित्ताने लहान मोठे परप्रांतीय व्यवसायिक वाडीवस्तीवर अनधिकृत राहत असुन त्या परिसरातील सामान्य जनतेची दिशाभूल करुन फसवणूक करीत असताना दिसत असल्याचे समोर येत आहे. फुगेवाले, दुकान शटरला ग्रीसिंग करुन देतो असे म्हणत शटरचा अंदाज घेणे, ग्रामीण भागात अनधिकृत वस्ती करून तेथील परिसराची टेहळणी करणे, जडीबुटी विकुन सामान्य नागरीकांना हजारो रुपयांना फसविले, सर्कस निमित्ताने अनधिकृत राहणे आणि वेळप्रसंगी घरफोडी, लुटमार करून रातोरात पसार होणे , गेल्या दोन ते तिन वर्ष अगोदर याच प्रकारचे परप्रांतीय येऊन शहरात अनेक घरफोड्या झालेल्या आढळल्या पण कोणावरही कारवाई करण्यात आली नव्हती. असाच प्रकार पुढे घडु नये यासाठी मनसे म्हसळा तालुका अध्यक्ष सौरभ गोरेगावकर व पदाधिकारी यांच्या मार्फत म्हसळा पोलीस ठाणे व नगरपंचायत येथे निवेदन देण्यात आले व पोलीस प्रशासन व नगरपंचायत यांनी या वर तातडीने लक्ष घालून परप्रांतीय अनधिकृत व्यवसाय करण्यासाठी आलेल्यांचा बंदोबस्त करावा व पुढील होणारे धोके लक्षात घ्यावेत. आणि जर तुमच्याने शक्य नसेल तर आमच्या मनसे स्टाईलने यांचा आम्ही बंदोबस्त करु असा सज्जड मनसेच्या वतीने ईशारा देण्यात आला.तसेच स्थानिकांनी व्यवसाय केला तर नगरपंचायत कडून लगेच कारवाई करण्यात येते व परप्रांतीय यांनी कुठेही व्यवसाय केला तर त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही या बद्दल तालुका अध्यक्ष सौरभ गोरगावकर यांनी खंत देखील व्यक्त केली. यावेळी निवेदन देतांना मनसे तालुका अध्यक्ष सौरभ गोरेगावकर, पप्पू जवळे, रुपेश साळुंखे, खताते, अनेक मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.