अ.ब.ब. मौजा हत्तीडोई येथील ग्रामपंचायतीचा शिपाई कामे सोडून बसला पत्ते फिटत पत्ते खेळत असताना फोटोच्या पुरावा देत ग्रा.पं. सदस्याने केली तक्रार

51
अ.ब.ब. मौजा हत्तीडोई येथील ग्रामपंचायतीचा शिपाई कामे सोडून बसला पत्ते फिटत पत्ते खेळत असताना फोटोच्या पुरावा देत ग्रा.पं. सदस्याने केली तक्रार

अ.ब.ब. मौजा हत्तीडोई येथील ग्रामपंचायतीचा शिपाई कामे सोडून बसला पत्ते फिटत

पत्ते खेळत असताना फोटोच्या पुरावा देत ग्रा.पं. सदस्याने केली तक्रार

अ.ब.ब. मौजा हत्तीडोई येथील ग्रामपंचायतीचा शिपाई कामे सोडून बसला पत्ते फिटत पत्ते खेळत असताना फोटोच्या पुरावा देत ग्रा.पं. सदस्याने केली तक्रार

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847📞

भंडारा : ( हत्तीडोई ) दिनांक ११ जानेवारी २०२४ रोजी भंडारा जिल्ह्यातील मोहदूरा नजीकच्या हत्तीडोई गावातील ग्रामपंचायत शिपाई नामे प्रेमानंद हरडे हा ग्रामपंचायत येथील कार्यालयीन काम सोडून गावात पत्ते खेळत असल्याचा आढळून आला. प्रत्येक खेळत असल्याच्या पुरावा देत ग्रामपंचायत सदस्य राजेश लांजेवार यांनी तक्रार केली आहे. ग्रामपंचायत सदस्य राजेश लांजेवार व तंटामुक्त समिती अध्यक्ष परविर कुर्वेकर यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पुरावासहित तक्रार पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी व ग्रामपंचायत हत्तीडोई येथील सरपंच सचिन यांच्याकडे केली आहे.
तक्रारीत नमूद असे केले की , शिपाई प्रेमानंद हरडे हा ग्रामपंचायत येथील कार्यालयीन कामे सोडून गावात पत्ते खेळत असल्याचा आढळून आला. हा कार्यालयीन कामे सांगितल्या प्रमाणे करीत नाही. तंटामुक्त समितीचे नोटीस वाटण्यास यापूर्वी मनाई केली. व ग्रामपंचायत सदस्य राजेश लांजेवार यांना उलट शब्दात बोलून अपमानित केले. त्यामुळे शिपायावर कारवाई करून कामावरून काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.
*ग्रामपंचायत शिपाई यांचे म्हणणे*
माझ्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे आहेत. ११ जानेवारी २०२४ रोजी मी वडिलांना दवाखान्यात नेण्याकरिता अर्धा दिवसाची सुट्टी घेतली होती. दवाखान्यात वडिलांचा इलाज करून मी गावी लवकर परत आलो. आणि पत्ते खेळत असलेल्या ठिकानी मनोरंजन म्हणून बसलो असल्याने माझे फोटो काढण्यात आले. मी कर्तव्यात कसूर केलेला नाही. आणि कुणाचाही अपमान केलेला नाही. हे मला ग्रामपंचायत मधून काढण्याचे सडयंत्र आहे. अशी मते ग्रामपंचायत सिपाई प्रेमानंद हरडे यांनी व्यक्त केली आहे.