यवतमाळ जिल्हातील नेर शहरांमध्ये आज मोठ्या प्रमाणावर नकली नोटाचे रॉकेट सक्रीय.

57

यवतमाळ जिल्हातील नेर शहरांमध्ये आज मोठ्या प्रमाणावर नकली नोटाचे रॉकेट सक्रीय.

चक्क एका पोलिस कर्मचाऱ्याच्या खिशातही बनावट नोट आल्याने खळबळ उडाली आहे. बनावट नोटा शहरात आल्याच कशा, याचा पर्दाफास करण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.

A large number of counterfeit note rockets are active in Ner cities of Yavatmal district today.
A large number of counterfeit note rockets are active in Ner cities of Yavatmal district today.

यवतमाळ :-  जिल्हातील नेर शहरांमध्ये आज मोठ्या प्रमाणावर नकली नोटाचे रॉकेट सक्रीय असल्याचे दिसून येत आहे. दोनशे रुपयांचा नकली नोटा यवतमाळ जिल्हात मिळुन येत असल्याचे अनेक लोकांनी बोलून दाखवले. मोठ्या प्रमाणात दोनशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आल्याने ग्राहक व व्यापारी वर्गांत चांगलीच धडकी भरली आहे. चक्क एका पोलिस कर्मचाऱ्याच्या खिशातही बनावट नोट आल्याने खळबळ उडाली आहे. बनावट नोटा शहरात आल्याच कशा, याचा पर्दाफास करण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.

कलर प्रिंटरवर झेरॉक्‍स करून बनावट नोटा पेट्रोल पंप, बाजार, दूध डेअरी, हॉटेल आदी ठिकाणी चलनात आणल्या जात आहेत. आता या नोटा सर्वसामान्य ग्राहकांच्याही खिशात गेल्या आहेत. एका पोलिस शिपायाला ही कुणीतरी दोनशे रुपयांची बनावट नोट देऊन फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला आहे. दीड वर्षांपूर्वी शहरात पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आल्या होत्या.

आता आणखी नव्याने दोनशे रुपयांच्या नोटा चलनात आल्यामुळे व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. पुन्हा दोनशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आल्याने तालुक्‍यात रॅकेट सक्रिय असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी बनावट नोटा चालविणाऱ्या रॅकेटचा पर्दाफास करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.