उन्नावमध्ये शेतात तीन अल्पवयीन मुली ओढणीने बांधलेल्या अवस्थेत आढळले, दोघींचा मृत्यू.

63

उन्नावमध्ये शेतात तीन अल्पवयीन मुली ओढणीने बांधलेल्या अवस्थेत आढळले, दोघींचा मृत्यू.

Three minor girls were found tied up in a field in Unnao, both of them dead.
Three minor girls were found tied up in a field in Unnao, both of them dead.

प्रतीनिधी 18 फेब्रुवारी

लखनऊ:- उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथे शेतात चारा घ्यायला गेलेल्या तीन अल्पवयीन मुली संशयित परिस्थितीत गव्हाच्या शेतात ओढणीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या. यापैकी दोन मुलींचा मृत्यू झाला आहे तर तिसऱ्या मुलीची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. ही घटना उन्नावच्या बबुरहा गावातील आहे. सूचना मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मुलींना तात्काळ असोहा सीएचसी येथे घेऊन गेले. मात्र, तिथे डॉक्टरांनी दोन मुलींना मृत घोषित केलं. प्राथमिक माहितीनुसार, तीन मुली जनावरांसाठी चारा घेण्यासाठी निघाल्या होत्या.

तीन अल्पवयीन मुली दुपारी जनावरांसाठी चारा घेण्यासाठी शेतात गेल्या होत्या. सायंकाळी उशिरापर्यंत जेव्हा त्या घरी परतल्या नाहीत तेव्हा त्यांचा शोध घेण्यात आला. सूरजपाल हे शेतात पोहोचले तेव्हा या तिघी बेशुद्ध पडल्या होत्या. एकाच ओढणीत तिघींचेही हात बांधलेले होते. घटनेचा तपास अधिकारी एडीजी एसएन रावतही रात्री उशिरा गावात पोहोचले.

Three minor girls were found tied up in a field in Unnao, both of them dead.

या प्रकरणी उन्नावच्या एसपीने सांगितलं की, जेव्हा मुली बऱ्याच वेळापर्यंत घरी परतल्या नाहीत तेव्हा त्यांचा शोध सुरुव करण्यात आला. यावेळी मुली शेतात सापडल्या. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं जिथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केलं. कुटुंबीयांच्या मते, “घटना स्थळावरुन मोठ्या प्रमाणात फेस आढळून आला. डॉक्टरांनी प्रथम दृष्ट्या विष प्राषण केल्याने मृत्यू झाल्याचं सांगितलं. घटनास्थळावर उपस्थित इतर लोकांच्या सांगण्यानुसार पोलीस तपास करत आहेत.”

हॉरर किलिंगच्या अँगलने तपास
पोलिसांना या दरम्यान अनेक महत्त्वाची माहिती मिळायला हवी. पोलीस आता या प्रकरणी हॉरर किलिंगच्या अँगलनेही तपास करत आहेत. पोलीस प्रत्येक अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेपूर्वी मुलींसोबत दोन मुलांना बघितलं गेलं होतं. तसेच, पोलिसांनी या प्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे. त्याची चौकशी सुरु आहे. तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण गावाचं रुपांतर छावणीत झालं आहे.

मुलीला दिल्ली एअरलिफ्ट करण्याची मागणी
तिसरी मुलगी जिची प्रकृती गंभीर आहे तिला कानपूरच्या रिजेन्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. भीम आर्मी ते काँग्रेसपर्यंत सर्वांनी या मुलीला दिल्ली एअरलिफ्ट करण्याची मागणी केली आहे.