सावली (वाघ) येथील गावकऱ्यांच्या आक्रमतेमुळे चक्काजाम आंदोलन प्रहारचे गजुभाऊ कुबडे यांनी गिट्टीखदान मालक व तहसीलदार साहेब यांच्या सोबत चर्चा

63

सावली (वाघ) येथील गावकऱ्यांच्या आक्रमतेमुळे चक्काजाम आंदोलन

प्रहारचे गजुभाऊ कुबडे यांनी गिट्टीखदान मालक व तहसीलदार साहेब यांच्या सोबत चर्चा

सावली (वाघ) येथील गावकऱ्यांच्या आक्रमतेमुळे चक्काजाम आंदोलन प्रहारचे गजुभाऊ कुबडे यांनी गिट्टीखदान मालक व तहसीलदार साहेब यांच्या सोबत चर्चा

✒करण विटाळे✒
हिंगणघाट तालुका ग्रामीण
प्रतिनिधी : 8806839078

हिंगणघाट तालुक्यातील सावली (वाघ) येथे गिट्टीखदान वरून येणारी जड वाहतून बंद करण्यासाठी एक महिन्यापासून प्रशासनाकडे वारंवार मागणी सुरु होती .यातच दिनांक 14/2/2022 ला सावली (वाघ) येथे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे व प्रहार सेवक अनंता वायसे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते.यात मा तहसीलदार मसाळ साहेब , तलाठी पाचखेडे साहेब, निनावे साहेब यांनी आश्वासन देऊन आंदोलन स्थगित केले व सर्व गिट्टीखदान मालकांना बोलावून दिनांक 16/02/2022 ला तहसील कार्यालय हिंगणघाट येथे तहसीलदार मसाळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले होते. सर्व आंदोलन कर्ते हजर झाले होते. पण गिट्टीखदान मालक हजर नसल्याने कोणत्याही मार्ग निघाला नाही. त्यामुळे आज दि.17 फरवरीला सकाळ पासून गिट्टीखदान वरून येणारी सर्व जड वाहतून रोखण्यात आली जड वाहतूक रोकताच गिट्टी खदाण मालक व प्रशासन हरकतीत आले व वाहतूक सुरू करण्यासाठी गिट्टीखदान मालकांनी व प्रशासन यांनी शर्थीचे प्रयत्न केले. ते निष्फळ ठरले शेवटी 4 वाजता प्रहारचे रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे यांनी आंदोलन स्थळी येऊन सर्व गिट्टीखदान मालक व तलाठी पाचखेडे साहेब व निनावे साहेब यांनी तहसीलदार साहेब यांच्याशी फोन द्वारे चर्चा करून मार्ग काढला आणि तहसील कार्यालय येथे 21/2/2022 ला बैठकीचे आयोजन केले.यावेळी प्रहारचे रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे, अनंता वायसे, सूरज कुबडे, सावली (वाघ) प्रहारचे शाखा प्रमुख दीपक पावडे ,उपशाखा प्रमुख पराग तिखट,मारोती पढाल, करणं विटाळे, प्रकाश मने, ईश्वर पुरी, गजानन जरिले, रोशन बरबटकर, प्रकाश गौळकर, किशोर देवगिरकर, मेघश्याम कुकडे, धीरज कुटे, ईश्वर उताणे, नितीन थुल, बालू डोंगरकर, जनार्धन डाऊले, रमेश मडावी, गिट्टीखदान चे सर्व मालक व असंख्य कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते.