मुरमाडी येथील मातोश्री राईस मिल समोर ट्रक आणि दुचाकी वाहनाचे समोरासमोर धडक
तीन ही व्यक्तींचा जागीच मृत्यू
त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953
सिंदेवाही : – सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की , मुरमाडी येथील मातोश्री राईस मिल समोर ट्रक आणि दुचाकी वाहनाचे समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील तीन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. दुचाकी क्रमांक एम एच ३४ ए झेड ५३५० असून राकेश रामदास मेश्राम (१६) रा.सिंदेवाही, विवेक राजेंद्र नान्हे (11) रा. मोठेगाव तहसील चिमूर व रोशन विठ्ठल मेश्राम (२५) हे दुचाकीवरून सरडपार वरून सिंदेवाहीकडे निघाले असताना विरुद्ध दिशेने येत असलेले ट्रक क्रमांक एम एच ३४ एबी ९१८७ ने मातोश्री राईस मिल मुरमाडी जवळ धडक दिली. यात दोन जण जागीच ठार झाले तर तिसरा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे.
मृतक हे एकमेकांचे नातेवाईक असून सिंदेवाही पोलीस तपास करीत आहेत.