विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करा : अरवेली गट शिक्षण अधिकारी धानोरा यांचे प्रतिपादन

53

विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करा : अरवेली गट शिक्षण अधिकारी धानोरा यांचे प्रतिपादन

विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करा : अरवेली गट शिक्षण अधिकारी धानोरा यांचे प्रतिपादन

*नंदलाल एस. कन्नाके*
*जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी*
*गडचिरोली*
*मिडिया वार्ता न्युज गडचिरोली*
*मो.नं. 7743989806*

*धानोरा* : आयोजित केलेल्या बिट स्तरीय दुसऱ्या शिक्षण परिषदेच्या उदघाटन सत्राचे अध्यक्ष गट शिक्षण अधिकारी अरवेली उपस्थित होते, तसेच कार्यक्रमाचे उदघाटन विनोदजी लेनगुरे जिल्हा परिषद सदस्य गडचिरोली तसेच कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून असलेले सलाम विस्तार अधिकारी धानोरा, तसेच संतोष मडावी शाळा व्यवस्थापन समिती लेखा, प्रतीक्षा ठोंबरे कैवल्या एज्युकेशन फौंडेशनच्या चे प्रोग्रॅम लीडर, शिक्षण परिषदेचे आयोजन ताराम केंद्र प्रमुख दुधमाला, कुद्रपवार केंद्र प्रमुख येरकड तसेच संध्या मोंढे केंद्र प्रमुख धानोरा, यांनी केले. मिलिंद भैसारे आणि गजानन आढाव कैवल्या एज्युकेशन फौंडेशनचे गांधी फेलो उपस्थित होते.
आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रास्थाविक ताराम यांनी केले तसेच सदर कार्यक्रमाचे संचालन पाल लेखा व आभार मोहूर्ले सर यांनी केले. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित फुलोरा समन्वयक व गट साधन व्यक्ती उपस्थित होते.
धानोरा तालुक्यामध्ये धानोरा, येरकड आणि दुधमाला बिट स्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन लेखा या ठिकाणी करण्यात आले. यावेळी शिक्षकांना मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार केला पाहिजे असे प्रतिपादन केले. कोविड -19 आजाराच्या प्रादुभावाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवतेचा विचार केला पाहिजे त्यासोबत आपण विद्यार्थी हा आपल्या आयुष्यात काही तरी करू शकला पाहिजे ही तयारी आपण विद्यार्थ्यांसाठी केले पाहिजे. तसेच चालणाऱ्या उपक्रमामध्ये उत्साहाने प्रतिसाद देऊन त्याप्रमाणे कृत्या आपल्या शाळेत करून गुणवत्ता वाढवावी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यसाठी आपण तत्पर असले पाहिजे.त्यानंतर आयोजित केलेल्या वेळापत्रकानुसार कृतीयुक्त सादरीकरण करण्यात आले. तसेच शिक्षण परिषदेचे वेळापत्रकानुसार विषय पार पडले.
आयोजित केलेल्या शिक्षण परिषदेला बहुसंख्य शिक्षक उपस्थित असून शिक्षण परिषदेतरतील विषय मनःपूर्वक ग्रहण केले.