जिल्हाधिकारी कार्यालयात ” राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने डी. जी. रंगारी सर सम्मानित “
✍ भवन लिल्हारे ✍
* मोहाडी तालुका पत्रकार *
📱८३०८७२६८५५📱
📞८७९९८४०८३८📞
भंडारा :- दिनांक १८ फेब्रुवारी २०२२ रोज शुक्रवारला भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ” महाराष्ट्र पत्रकार संघ मुंबई तर्फे राज्यस्तरीय नवरत्न पुरस्कार, पत्रकार पुरस्कार,समाजभूषण पुरस्कार, सोहळा भंडारा जिल्हाच्या वतीने भंडारा जिल्हा कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणारे अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. महेश पाटील सर उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीपती मोरे सर उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना भंडारा यांच्या उपस्थितीत व महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. शिवशंकर टेंभरे यांच्या हस्ते श्री. डी. जी. रंगारी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांना ” राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ” त्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
या प्रसंगी उपजिल्हाधिकारी येथील प्रशासकीय अधिकारी मंडळी व महाराष्ट्र पत्रकार संघाचे सर्व कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते. सर्व कार्यकर्त्यांनी डी. जी. रंगारी सरांचे अभिनंदन केले.