शिवशाही युवक मित्र परिवार, मुल द्वारा आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा २०२२.
✍भवन लिल्हारे ✍
मोहाडी तालुका पत्रकार
📱८३०८७२६८५५📲
📞८७९९८४०८३८📞
मुल :- जगाच्या पाठीवर समतेचे व न्यायाचे राज्य निर्माण करुन माणसातील मानुसपना जागे करणारे, मानवतेच्या अस्मितेचे जनक विश्ववंद्य, कुळवाडीभूषण ” छत्रपती शिवाजी महाराज” यांची ३९२ वी जयंती १९ फेब्रुवारी २०२२ जगात सर्वत्र साजरी होत आहे.
दरवर्षी प्रमाणे १९ फेब्रुवारी हा ” शिवजन्मोत्सवाचा दिवस” ” शिवशाही युवक मित्र परिवार मुल” च्या वतीने लोकोत्सव म्हणुन साजरा करण्यात येत आहे.
दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ गुरुवारला मा.सा. कन्नमवार सभागृहात सायंकाळी ५:०० ते १०:०० पर्यंत व्याख्यानमालेत मुंबई येथील प्रसिद्ध व्याख्याने ” शिवश्री कपिल ढोके “यांचे मार्गदर्शन मुल वासियांना लाभले आहे, सोबतच कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणुन प्रत्यक्ष परिस्थिती समजुन देशाच्या प्रत्येक गाव, तालुके, जिल्हा, राज्य, आणि देशातील कोणा कोपऱ्यात असणाऱ्या प्रत्येक गाव शहरात जनतेला माहिती पोहचवण्याचे काम पत्रकारांनी केले असुन सामाजिक काम करीत आहेत.
हा उद्देश समोर ठेऊन मूल शहरातील सर्व पत्रकारांचा सत्कार समारंभ कार्यक्रम ठेवण्यात आले आहे,
दिनांक १८ फेब्रुवारी २०२२ शुक्रवारी उपजिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळ वाटण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आले आहे, दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ रोज शनिवारला ” भव्य शोभायात्रा व पालखी कार्यक्रम सायंकाळी ४:०० वाजे पासुन रात्री १०:०० वाजे पर्यंत भव्य पालखी सोहळा व महापुजन आयोजित करण्यात आले आहेत,” शिवशाही मित्र परिवारातर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षी शुद्धा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे,
कार्यक्रमात प्रामुख्यानं शिवभक्तांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ” शिवशाही युवक मित्र परिवाराचे अध्यक्ष श्री. पंकजभाऊ कोहळे, उपाध्यक्ष श्री. जितेंद्रसिंग पटवा, सचिव श्री. किशन शेरकी ” आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केले आहे.