गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम

54

गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम

गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम

✍मनोज खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
📱9860020016📱

औरंगाबाद : – गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे राहील.
गुरुवार दिनांक 17 फेब्रुवारी 2022 सकाळी 8.30 वा. मोटारीने अहमदनगर येथून फोर्टव्हयू ॲडव्हेंचर रिसॉर्ट, दौलताबाद, औरंगाबादकडे प्रयाण. सकाळी 11 वा. फोर्टव्हयू ॲडव्हेंचर रिसॉर्ट, दौलताबाद,औरंगाबाद येथे आगमन व दुपारी 1.30 वा. मोटारीने फोर्टव्हयू ॲडव्हेंचर रिसॉर्ट, दौलताबाद, येथून पोलीस आयुक्त,औरंगाबाद शहर कार्यालय, औरंगाबादकडे प्रयाण. दुपारी 2 वा. पोलीस आयुक्त कार्यालय, औरंगाबाद येथे आगमन व महिला, ज्येष्ठ नागरीक सुरक्षा व कायदा याबाबत चित्रांरुप एकत्र केलेल्या मार्गदर्शक संकलनाचे प्रकाशन व पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर कार्यालयांतर्गत कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी व इतर विषयांच्या अनुषंगाने आढावा बैठक. ( स्थळ:- पोलीस आयुक्त कार्यालय, औरंगाबाद.) दुपारी 3.30 वा. औरंगाबाद परिक्षेत्रांतर्गत कायदा व सुव्यवस्था व इतर विषयांच्या अनुषंगाने विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र यांचे समवेत, आढावा बैठक. (स्थळ:- पोलीस आयुक्त कार्यालय, औरंगाबाद.) सांय. 7 वा. मोटारीने पोलीस आयुक्त कार्यालय, औरंगाबाद येथून विमानतळाकडे प्रयाण. सांय. 7.30 वा. औरंगाबाद विमानतळ, चिकलठाणा औरंगाबाद येथे आगमन. रात्री 8.20 वा. विमनाने मुंबईकडे प्रयाण.