“कैद्यांचे अधिकार” या विषयावर विधीसेवाद्वारे मार्गदर्शन
✍ मनोज खोब्रागडे ✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
📱9860020016📱
यवतमाळ : – कैद्यांचे अधिकार व प्ली बारगेनिंग’ या विषयावर जिल्हा कारागृह, यवतमाळ येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच जिल्हा कारागृह यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने नुकतेच एका शिबीरातून मार्गदर्शन करण्यात आले.
शिबीराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. एम. आर. ए. शेख हे होते तर प्रमुख वक्ते म्हणुन ॲड. अजय चमेडिया तसेच जिल्हा कारागृहाचे प्रभारी अधिक्षक एस.पी. काळे, तुरूंगाधिकारी एस.बी. शेख, डॉ. रंजित मंडाले, निलेश आडे उपस्थीत होते.
याप्रसंगी ॲड. अजय चमेडिया यांनी कैद्यांचे अधिकार व प्ली बारगेनिंग तसेच आरोपीकरीता असलेल्या अधिकारांबाबत विस्तृत माहिती उपस्थीत बंद्याना दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष एम.आर.ए. शेख यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांची व कार्याची माहिती दिली. यामध्ये आरोपीकरीता मोफत वकीलांची नेमणुक करण्यात येते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे मोफत विधी सेवा, सहाय आणि सल्ला देण्यात येतो. यात प्रामुख्याने महिला मुले, अनुसुचित जाती जमाती चे लोक, तुरूंगातील कैदी तसेच ज्याचे वार्षिक उत्पन्न रूपये तीन लाख पेक्षा जास्त नाही अशा सर्वांना मोफत वकील देवून सहाय व सल्ला देण्याचे काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कारागृहातील अधिकारी व बंदी उपस्थित होते.