महाशिवरात्री: हरहर महादेवाचा गजर

सौ.संगीता संतोष ठलाल 

मु.कुरखेडा जि.गडचिरोली 

मो: ७८२१८१६४८५

 आज महाशिवरात्री त्या निमित्ताने सर्व भाविक, भक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक,हार्दिक शुभेच्छा आज बघितले तर या पृथ्वीतलावर सर्वात जास्त देऊळ म्हणजेच महादेवाचे दिसतात कदाचित मोजकेच असे गाव असतील की, तेथे महादेवाचे देऊळ नसतील .महादेवाचे अनेक रूप व अनेक नाव आहेत तसेच बारा ज्योतिर्लिंग सुद्धा आहेत. महादेवाचे रूप इतर देवांपेक्षा वेगळे आहेत. भोळा शंकर या नावानेही पुजतात काही भक्तांचे म्हणणे आहे की, भोळा शंकर हा भक्तांच्या हाकेला धावून येत असतो, सदैव पाठीशी उभा राहतो. पण, त्याच्यावर तेवढा विश्वास व मनात श्रध्दा असायला पाहिजे आणि नि:स्वार्थ भावना आणि सोबत प्रयत्न असतील तर..तो नक्कीच सत्कर्म पाहून प्रसन्न होतो.व मनोकामना पूर्ण करत असतो.महादेवापाशी जातीभेद नसतोच कारण, तो सर्वांना एकसारखेच बघत असतो त्याच्या साठी सर्वजण एकसमान असतात. या पृथ्वीतलावर राहणारे पशू, पक्षी, माणूस प्राणी, झाडे, झुडपे त्याचीच लेकरे आहेत म्हणून त्याला देवाधिदेव महादेव अहेही म्हणतात. भक्ताच्या संकट समयी हाकेला धावून गेल्याने त्याचे नावही तसेच अजरामर झालेले आहेत जसे, परम भक्त मार्कंडेय ऋषीची भक्ती पाहून धावून गेल्याने तेव्हापासून मार्कडेश्वर असे नाव पडले आहेत ,मर्यादा पुरूषोत्तम प्रभू श्रीरामचंद्राची प्रार्थना ऐकून धावून आले तेव्हापासून रामेश्वर हे नाव पडलेले आहेत असे अनेक नावाने महादेवाचे नाव अजरामर झालेले आहेत 

 

 

  *महादेवाचा गजर करती*

    *वाहती बेलाचे पान*

    *पंच्चामृताने अभिषेक करूनी*

     *करती मनोभावे पूजन*

 

      महादेवाला बेलाचे पान जास्त आवडतात असे अनेक भक्तांचे म्हणणे आहे म्हणून हिंदू धर्मातील पवित्र मानल्या गेलेल्या श्रावण महिन्यात अनेक शिव मंदिरात जाऊन पंच्चामृताने अभिषेक करतात व महादेवाची आरती करतात त्याच प्रमाणे वर्षातून एकदाच येणारी सर्वात मोठी ही महाशिवरात्री आहे त्या निमित्ताने पंधरा दिवस त्या ठिकाणी यात्रा भरते. अनेक पहाडावर भक्तगण महादेवाच्या दर्शनासाठी आवर्जून जात असतात. मुखात त्यांच्या हरहर महादेवाचा गजर असतो सोबत महादेवाचे गाणे सुद्धा म्हणत असतात. सर्वामध्ये एक प्रकारचा आनंद बघायला मिळतो कोणाच्याही मनात भेदभाव बघायला मिळत नाही, जातीभेद दिसत नाही हे सर्व बघून माणुसकी धर्म असल्याची जाणीव होते खऱ्या अर्थाने अशीच राहणे आवश्यक आहे. 

 

 *महादेवा येतो गा दर्शनाला*

  *तुझे स्थान आहे उंचावर*

  *हरहर महादेव म्हणतो*

   *करतो मी तुझा गजर*

 

       असच एक महादेवाचे जागृत देवस्थान गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील छोटसं खेडगाव असलेल्या अरततोंडी या गावी जवळच असलेल्या पहाडावर आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने दरवर्षी तिथे पंधरा दिवस यात्रा भरते तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी काही भक्तगण महादेवाला राखी चढविण्यासाठी जात असतात तसेच दर सोमवारी किंवा सुट्टीच्या दिवसांत दुरदूरचे लोक तिथे दर्शन घेण्यासाठी येत असतात. तिथे एक गोष्ट अवश्य बघायला मिळत ती म्हणजेच कोणतीही व्यक्ती उपाशी असेल आणि त्याच्या ओळखीचे कोणीही नसतील तरीही तिथेच एखाद्या गावचे सामूहिक स्वयंपाक करत असतील तर..अनोळखी व्यक्तीला सुद्धा जेवू घालत असतात बरेच जणांचे म्हणणे आहे की, अरततोंडी गडावरचा महादेव जागृत आहे अनेकांची श्रध्दा आहे. तिथे बऱ्याच सोयी सुविधा आहेत सोबत पाण्याची सुद्धा सोय आहे पंधरा दिवसात भजन ,कीर्तन, जागरण असतो आणि शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. अशा निसर्गरम्य असलेल्या या अरततोंडी गडावरील हेमाडपंथी देऊळ असलेल्या महादेवाच्या दर्शनासाठी एकदा तरी सर्वानी आवर्जून जावे. खूप काही बघण्यासारखे आहे मी, दरवर्षी या स्थळाला भेट देत असते. त्यातून मला खूप काही शिकायला सुध्दा मिळत असते . सोबत मनाला कुठेतरी एक प्रकारचा समाधान मिळत असतो. हरहर महादेवाच्या गजराने सारा पहाड दुमदुमून जातो सोबत गडचिरोली जिल्ह्यात अरततोंडी छोट्याशा या गावाची सुद्धा महादेवाची पहाडी या नावाने ओळख निर्माण झालेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here