म्हसळा पाणीपुरवठा प्रकल्प भुमिपुजन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न रायगड जिल्हाचा खासदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच असणार हे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तुम्हांला शब्द देतो..उपमुख्यमंत्री अजित पवार.

50
म्हसळा पाणीपुरवठा प्रकल्प भुमिपुजन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न रायगड जिल्हाचा खासदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच असणार हे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तुम्हांला शब्द देतो..उपमुख्यमंत्री अजित पवार.

म्हसळा पाणीपुरवठा प्रकल्प भुमिपुजन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न

रायगड जिल्हाचा खासदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच असणार हे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तुम्हांला शब्द देतो..उपमुख्यमंत्री अजित पवार.

म्हसळा पाणीपुरवठा प्रकल्प भुमिपुजन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न रायगड जिल्हाचा खासदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच असणार हे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तुम्हांला शब्द देतो..उपमुख्यमंत्री अजित पवार.

✍️संतोष उध्दरकर.✍️
म्हसळा शहर प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞

म्हसळा :- महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत म्हसळा शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचे भुमिपुजन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी प्रथम म्हसळेकरांचे आभार व्यक्त केले की तुम्ही माझे स्वागत केले आहे ते अविस्मरणीय आहे . रायगड जिल्ह्यात तुम्ही सुनील तटकरे यांच्या पाठीशी हिमतीने उभे राहिलात म्हणून च आज रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीर पणे उभा आहे. उन्हाळ्यात पाणी चणचण भासत असताना पाभरे धरण या मध्ये लक्ष घालून तसेच नगरपंचायत ठराव पास करून २०२४ ते संकल्पित वर्ष २०५४ लोकसंखेचा साधारण वाढ लक्षात घेऊन आदिती तटकरे यांच्या अथक प्रयत्नाने ४२.९२ कोटी पाणीपुरवठा प्रकल्पासाठी मंजूर केले आहेत, व काही झाले तरी ही योजना निधी अभावी रखडली आहे असे मी होऊ देणार नाही वेळेआधी निधी दिला जाईल व काम पुर्णत्वास नेले जाईल असे मेळाव्यात स्पष्ट केले, तसेच मुलींना वैद्यकीय महाविद्यालयीन शिक्षण मोफत देण्याचे आश्वासन दिले, व पवार यांनी राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले,तसेच उद्याच्या लोकसभा निवडणुकीत आपला खासदार रायगडमध्ये उभा राहणार आहे, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळणार हे देखील असंख्य कार्यकर्ते यांच्या समोर स्पष्ट केले, व तुमच्या मनामध्ये असणारा निर्णय हा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने घेतला जाईल या निमित्ताने मी तुम्हांला शब्द देतो .या मुळे पुढील लोकसभेचे उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील तटकरेच असणार असे अजित पवार यांनी संकेत दिले. या मेळावा मध्ये अनेकांनी पक्ष प्रवेश केले या मध्ये शिवसेना उ. बा. ठा. पक्षाचे म्हसळा नगरपंचायत नगरसेवक अनिकेत पानसरे यांच्या समवेत अनेक सहकारी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला व पक्षाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा अध्यक्ष उमाताई मुंडे, विजय मोरे, महम्मद मेमन, नगराध्यक्ष संजय कर्णिक, उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, रायगड पोलीस अधीक्षक घारगे, तालुका अध्यक्ष समीर बनकर,नाजिम हास्वारे,शाहिद उकये,मुसद्दिक ईमानदार, नगरसेवक सुनील शेडगे, महेश घोले, नगरसेविका जयश्री ताई कापरे,नगरसेविका सरोज म्हशिलकर,सोनल घोले,शगुप्ता जहांगीर, वृक्षाली घोसाळकर,वनिता खोत, रेश्मा कानसे, तसेच सर्व पदाधिकारी, सर्व नगरसेवक, असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते,