अलिबागमध्ये शिवजयंतीनिमित्त समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:-रायगड जिल्ह्यात १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात येणार असून त्यानिमित्त शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर भव्य स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
या मोहिमेत मुख्याधिकारी सचिन बच्छाव, स्वच्छता निरीक्षक, पाणी पुरवठा अभियंता तसेच समन्वयक आर्या जाधव, प्रियांका वाघ यांनी सहभाग घेतला.
अलिबाग नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत किनाऱ्यावरील स्वच्छतेत योगदान दिले.
यावेळी माझी वसुंधरा मोहीमे अंतर्गत विद्यार्थ्यांना स्वच्छते विषयी शपथ दिली.
अलिबाग नगर परिषदेच्या पाचही शाळांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वाचा संदेश देण्यात आला.