पनवेल: पनवेल रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूला मोकळी असलेली जमिन रेल्वेचे उत्पन्न वाढावे म्हणून प्रवाशांच्या वाहनांसाठी पार्किंग वाहन तळासाठी भाडे तत्वावर दिलेली आहे.M/S RANJANA ENTERPRISES PARKING NO A, या नांवाने “पे अॅन्ड पार्कींग” सद्या चालू असुन या ठिकाणी या नांवांच्या संस्थेच्या मालकाने “पे अॅन्ड पार्कींग” चालावे म्हणून काही कर्मचारी नेमलेले आहे.
हे कर्मचारी या पार्कींग वाहन तळावर येणाऱ्या प्रवाश्यांना वाहने हे कर्मचारी सांगतील त्या ठिकाणी लावायला सांगतांत व संध्याकांळी जेव्हा प्रवाशी आपली वाहने घेण्यासाठी या पार्कींग वाहन तळावर येतात तेव्हा आपली वाहने काढून घेण्यासाठी हमाली करावी लागते. कारण “पे अॅन्ड पार्किंगच्या नेमलेल्या माणसानी प्रत्येक वाहन अश्या पध्दतीने लावलेली असतात की ते प्रवाश्यांनी कीती ही प्रयत्न केले तरी ते काढू शकत नाही अश्या वेळी या पे अॅन्ड पार्कींगच्या माणसांना विंनती करावी लागते पण त्यांचे एकच ऊत्तर एकायला येते की, आम्ही तूमची वाहने काढून देते वेळी आजूबाजूच्या वाहनाला धक्का लागल्या व वाहनाचे नूकसान झाल्यास आम्हांला भूर्दंड भरावा लागेल. तेव्हा तूम्हीच आप आपली दूचाकी वाहने काढा.
या वरून “प्रवाशी व पे अॅन्ड पार्किंगच्या या मनमानी करणाऱ्या माणसाला कायदेशीर रितीने बोलल्यावर हीच माणसे अंगावर धावून येतात व घाणेरड्या भाषेमधे शिविगाळ करून “जिवे”मारण्याची धमकी दिली जाते. हे कीतपत योग्य आहे? असा सवाल नागरीक करत आहेत. तसेच या पे अॅन्ड पार्कींगच्या मोकळ्या जागे मधे ठिकठिकाणी छोटे, मोठे खड्डे असून छोटे, मोठे दगडधोंडे पसरलेले आहे.त्यामूळे वाहने नीट रांगे मधे लावता येत नाही. हे पे अॅन्ड पार्कींग वाहन तळ सूसज्ज करुन देणे कोणाचे काम आहे? या बाबत स्थानिक रेल्वे प्रशासन ऊदासिन असून पे अॅन्ड पार्कींगचे ठेकेदार हे थेट वरती हात करून मोकळे होतात. मात्र “प्रवाश्यांना “पे अॅन्ड पार्कींग वाहन तळाची रितशिर पावती व दर महा पास काढावाच लागतो अश्या प्रकारे अन्याय सहन करावा लागत आहे.
याला विरोध करणारे आमचे पत्रकार श्री सूनिल जाधव यांना दि.15/02/2025 शनिवारी सकाळीच या अन्यायकारक घटनेला सामोरे जावे लागले. श्रीयूत जाधव यांनी स्थानिक पनवेल रेल्वे स्टेशन मास्टर व रेल्वे पोलिसांना रितशिर तक्रार केली असता फक्त नांवाला चौकशी करण्यांत आली. मात्र कडक कारवाई करण्यांस पनवेल रेल्वे प्रशासनाने असमर्थता दाखविली तरी पनवेल रेल्वे प्रशासनाने तातडीने M/S RANJANA ENTERPRISE PARKING NO. A, असे अन्याय व गूंडागर्दी करणाऱ्या ठेकेदारांची हकालपट्टी करून त्याच्या कायदेशिर कारवाई करून त्या जागी योग्य सेवा देणाऱ्या ठेकेदाराची नेमणूक करावी. अन्यथा या बाबत मा.रेल्वे मंत्री महोदय,रेल्वे बोर्ड याच्यांकडे निवेदन देण्यात येतील व त्रस्त नागरिकांकडून तीव्र आदोंलन छेडण्यांत येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.