महाराष्ट्रात 24 तासांमध्ये कोरोनाचा उद्रेक, ताज्या आकड्यांनी चिंता वाढवली.
✒नीलम खरात प्रतिनिधी✒
मुंबई:- महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरूच आहे. महाराष्ट्रात लागू केलेल्या निर्बंधांच्या बाबत कोरोना संसर्गाची नवीन प्रकरणे सतत वाढत आहेत. गेल्या 24 तासांत राज्यात 23,179 नवीन संसर्गाच्या घटना घडल्या असून यामुळे 84 लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वात जास्त नागपूर, मुंबई आणि पुण्यात याची नोंद करण्यात आली आहे. 17 मार्चला नागपूर कोरोना लॉकडाउनमध्ये कोरोना संसर्गाच्या 3370 नवीन घटना समोर आल्या असून 16 लोकांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेक 9 मार्च 2020 रोजी सुरू झाला. या दिवशी भारताच्या महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या साथीच्या आजाराची पहिली नोंद झाली. 17 मार्च 2020 रोजी महाराष्ट्रात पहिल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली. महाराष्ट्र हे देशातील कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव झालेले राज्य आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 53,080 लोकांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना व्हायरसची नव्याने लागण झालेल्या रूग्णांपैकी 60 टक्के रूग्णसंख्या पाच राज्यांमध्ये आहे. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू यांचा समावेश आहे. कोविडचे नव्याने सर्वात जास्त रूग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात 23 हजार पेक्षा जास्त नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात एका दिवसामध्ये 10 हजार पेक्षा जास्त कोरोनाबाधित बरे झाले आहेत.
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी सांगितले की, लसीकरणाला वेग आला आहे. यासाठी कोरोना लसीचे 2.20 कोटी डोस केंद्र सरकारकडे मागविले गेले आहेत. टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना पत्र लिहिले असून दर आठवड्याला 20 लाख डोस राज्यांना उपलब्ध करुन देण्यात यावेत अशी मागणी केली आहे.
दरम्यान, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज दिवसभरात तब्बल 318 रुग्णांची वाढ तर तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोना बाधितांची एकूण संख्या 58 हजार 218, सक्रिय बाधित संख्या 2012 असून एकूण मृत्यूची संख्या 1144 वर पोहोचली आहे.
पुण्यात दिवसभरात 2587 रुग्ण वाढले आहेत तर दिवसभरात 769 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात करोनाबाधीत 16 रुग्णांचा मृत्यू झाला असून 425 रुग्ण क्रिटिकल आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 223797
नाशिकमध्ये 24 तासात कोरोना रुग्णसंख्येत रेकॉर्डब्रेक वाढ झाली आहे. काल दिवसभरात जिल्ह्यात तब्बल 2146 जणांना कोरोनाची लागण तर 9 रुग्ण दगावले आहेत. नाशिक शहरात 1296, नाशिक ग्रामीण 631, मालेगाव मनपा 174, जिल्हा बाह्य 45 रुग्ण समोर आले आहेत.