आर. एस. बिडकर महाविद्यालय हिंगणघाट येथे सायबर गुन्हे जनजागृती अभियान

56

सायबर गुन्ह्याबाबत विद्यार्थीनी व शिक्षक यांना करण्यात आले मार्गदर्शन 

आर. एस. बिडकर महाविद्यालय हिंगणघाट येथे सायबर गुन्हे जनजागृती अभियान

✒️करण विटाळे✒️
हिंगणघाट तालुका ग्रामीण
प्रतिनिधी : 8806839078

हिंगणघाट: १५ मार्च  रोजी आर.एस. बिडकर महाविद्यालय, हिंगणघाट तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने किशोरवयीन विद्यार्थिनी करिता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सायबर शाखा प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक श्री महेंद्र इंगळे यांनी फेसबूक, व्हाट्सअॅप व इतर सोशल मिडीयाचे गैरवापर रोखण्याकरीता व सायबर जगात स्वतःला सुरक्षीत ठेवण्याच्या उपायांची माहिती दिली तसेच ऑनलाईन बॅंकीग व्यवहारातील फसवणूकीपासून स्वतचा बचाव करून इतर लोकांना सुध्दा सतर्क करण्याबाबत सांगण्यात आले. गुन्हा होण्यापूर्वी त्यावर प्रतिबंध व जनजागृती हाच नुकसानापासून वाचण्याचा सर्वात चांगला उपाय आहे या बाबत माहिती दिली.

सदर कार्यक्रमास आर.एस. बिडकर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री भास्कर आंबटकर, उपप्राचार्य श्री बालाजी राजुरकर, प्रमुख अतिथि मा. पोलीस निरीक्षक श्री संपत चौव्हाण, ठाणेदार, पोलीस स्टेशन हिंगणघाट, सहायक पोलीस निरीक्षक श्री महेंद्र इंगळे, पोउपनि. श्री दिपेश ठाकरे, पो. स्टे. हिंगणघाट, विज्ञान विभाग प्रमुख श्री रंजन घुबडे, कार्यक्रम अधिकारी जया जॉन, श्री विजय झाडे, श्री म्हैसकर, श्री जयंत शेंडे, श्री किशोर भुते, श्रीमती ज्योसना जुमडे, श्रीमती श्रुती घरडे, सायबर शाखा, वर्धा येथील स्टाफ तसेच इतर शिक्षक वर्ग व २०० विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

हे आपण वाचलंत का?