शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा विज पुरवठा खंडीत करण्याच्या निषेधार्थ काढण्यात आला मोर्चा

भवन लिल्हारे ✍️
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
📞 ८७९९८४०८३८
लाखनी :- भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात येणारे लाखनी येथे दिनांक १५ मार्च २०२२ रोज मंगळवारला विज महावितरण कंपनीकडुन कोणतीही पुर्वसुचना किंवा नोटीस न देता शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा विज पुरवठा खंडीत करण्यात येत आहे. त्या निषेधार्त ” छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी, शेतमजुर संघटनेच्या वतीने विजमहावितरण कार्यालयावर मोर्चा काढून घेराव व रास्ता रोको आंदोलन करण्यात आला.
विजवितरण कार्यालयीन अधिकारी मा. निमजे सर, तहसीलदार मा. शितोळे सर, माझी आमदार मा. सेवकभाऊ वाघाये यांचे समक्ष मागण्यांचे निवेदन स्विकारूण आक्रोशित शेतकऱ्यांना शांत करण्यात आले, कृषी पंपाचे खंडीत केलेले विज कनेक्सन जोडण्यात येईल, तीन महिन्यापर्यंत कोणत्याच प्रकारचा कृषिपंपाचे विजकनेक्सन तोडले जाणार नाही. ज्या शेतकर्यांचे विजबिलामध्ये काही त्रुटी असतील तर शेतकऱ्यांनी विज कार्यालयात जाऊन आपले बिल दुरुस्ती करूनच बिल भरावे. असे आश्वासन साकोली विद्युत कार्यालयाचे मुख्य अभियंता मा. परिहार सर यांनी दिले.
हे आपण वाचलंत का?
- शिमगा ते होला मोहल्ला, विंचू होळी ते स्मशानाच्या राखेपासून खेळली जाणारी होळी, होळी साजरी करण्याचे थरारक प्रकार
- समाजाच्या प्रगतीची केंद्र बनलेल्या आदर्श बुद्धविहारांचा “शोध आदर्श बुद्धविहारांचा” या मीडियावार्ताच्या उपक्रमाद्वारे होणार सन्मान
- रंगाच्या होळीला बेरंग करू नका
दोन दिवसात खंडीत झालेले कनेक्सन सुरु झाले नाहीतर संघटनेमार्फत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार सेवक वाघाये आणि संघटनेचे अध्यक्ष मा. मनोज पटले, धनराज बोपचे ग्राम पंचायत सदस्य कृष्णा खंडईत, भुमेश्वर पट्ले, सतीष बघेले, जि.प. सदस्या शर्मिला पटले, प.स. सदस्य गिरीश बावण कुळे, मुलचंद राहांगडाले, बाबा पटले, सुरेश बोपचे, उमेश ठाकरे, खुमेश बोपचे, पुरण पटले, डेकराम राहांगडाले, सुधाकर हटवार, सतीष बिसेन, पुरुषोत्तम वंजारी, प्यारेलाल पटले, बाबा ठाकरे, भोंडेकर, पलिकचंद राहांगडाले, प्रभाकर पटले हे या क्षणी उपस्थित होते.