मौजा सिल्ली येथे सार्वजनीक विहिरीच्या जागेवर घरकुल मंजुर

59

गरीब लाभार्थी मात्र घरकुल योजने पासुन वंचीत

मौजा सिल्ली येथे सार्वजनीक विहिरीच्या जागेवर घरकुल मंजुर

✍️ भवन लिल्हारे 
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
📱 ८३०८७२६८५५ 
📞 ८७९९८४०८३८

भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील मौजा सिल्ली येथे सार्वजनीक ठिकानी असलेल्या विहीरीच्या जागेवर अतीक्रमण करून एका लाभार्थ्याला ग्रामपंचायत पदाधिकार्‍याने घरकुल योजना मंजुर केल्याचा आरोप सिल्ली ग्रामपंचायतच्या माझी सरपंच सौ. कुसुम बनसोड यांनी केला आहे. भंडारा तालुक्यातील सिल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्त्यालगत एक सार्वजनिक विहीर आहे, त्याला लागुन एकाचे मंजुर घरकुलाचे घर आहे. 

बांधकाम हे सार्वजनीक विहीर व सार्वजनीक रस्त्याला लागून होत असल्यामुळे सामान्य नागरिकांना रहदारीसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. सार्वजनीक रहदारीला बाधा निर्माण करणारे बांधकाम तत्काळ थांबवून ही घरकुल योजना रदद् करावी तसेच पदाचा दुरुपयोग करूण सार्वजनीक जागेवर घरकुल मंजुर करणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी सिल्ली येथील जनतेने खंडविकास अधिकारी, जिल्हाअधिकारी यांना दिलेला निवेदनातून केली आहे.

 

हे आपण वाचलंत का?

 

परंतु भंडारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजा सिल्ली ग्रामपंचायत अंतर्गत घरकुल यादीत शंकरपटा लगतच्या आबादीवर ३५ पेक्षा अधिक लाभार्थी घरकुल योजनेच्या प्रतिक्षेत वाट पाहत आहे. मात्र ही आबादी जागा अतिक्रमीत जागेत असल्यामुळे घरकुल योजनेचा लाभ देता येत नसल्याने सांगून त्यांना, घरकुल योजनेपासुन वंचीत केले आहे. असे सर्रास स्पष्ट दिसुन येत आहेत, मात्र सिल्ली ग्रामवासी यांनी दिलेल्या निवेदनात त्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी अपील केली आहे. व पदाचा दुरुपयोग करणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकारीवर कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.