
भवन लिल्हारे ✍️
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
📱 8799840838
नका करू हो कत्तल कधी
त्या मुक्या नैसर्गिक झाडांची
करायची झाली तर कधी होळी करा विकृत विचारांची …..!
होलिकाला जिवंत जाळले
जाणिव ठेवा या कृत्याची
करायचीच झली तर कधी
होळी करा विकृत विचारांची ….!!
रंगाच्या आडून मौज मस्ती
नको त्या आई बहिणींची
करायची झाली तर कधी
होळी करा विकृत विचारांची ..!!!
दवाखान्या शिवाय पर्याय नाही
नको त्या रूढी परंपरेची
करायची झाली तर कधी
होळी करा विकृत विचारांची.!!!!
नको कोणाप्रति व्देष भाव
अन् नका करू हौस होळीची
करायची झाली तर कधी
होळी करा विकृत विचारांची.!!!!
– बी. एस. लिल्हारे