13 रोजी नागपुरातून निघालेली ही पदयात्रा आज 17 रोजी कारंजात पोहोचली.

✍️ त्रिशा राऊत✍️
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
मो.(9096817953)
नागपूर : श्री शिर्डी साई द्वारकामाई पदयात्रा सेवा समिती नागपूरच्या वतीने शिर्डीकरिता निघालेल्या पदयात्रेचे कारंजा येथे जोरदार स्वागत करण्यात आले.13 रोजी नागपुरातून निघालेली ही पदयात्रा आज 17 रोजी कारंजात पोहोचली. कारंजा शहरापासून 20किलोमीटर अंतरावर पोहोचलेल्या पदयात्रेकरूना इंदरमारी फाट्यावर नास्ता देण्यात आला. श्रीराम नवमीला ही पदयात्रा शिर्डी येथे पोहोचते.
या पदयात्रेला भाकरे महाराज मित्र परिवार तर्फे स्नेहभोजन आणि आज इंदरमारी फाट्यावर मोटवाणी मित्र परिवारतर्फे नास्ता देण्यात आला. कारंजा शहरातील प्रल्हाद मोटवाणी, राम प्रांजळे, संजय सातपुरे, कैलास अग्रवाल, अशोक निचर, कैलास मोटवाणी, हेमराज खोब्रागडे, सतीश हाडे, बाबा मस्के, अरुण पालिवाल, बकुल जसानी, गोपाल पालिवाल ,विठ्ठल चाफले, शशांक मोटवाणी, गेंदराज टोपले ,कमलेश कठाने, सचिन ढबाले, नितीन चोपडे, हेमंत गोरे, राम वसुले, प्रवीण देशमुख यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
हे आपण वाचलंत का?
- शिमगा ते होला मोहल्ला, विंचू होळी ते स्मशानाच्या राखेपासून खेळली जाणारी होळी, होळी साजरी करण्याचे थरारक प्रकार
- समाजाच्या प्रगतीची केंद्र बनलेल्या आदर्श बुद्धविहारांचा “शोध आदर्श बुद्धविहारांचा” या मीडियावार्ताच्या उपक्रमाद्वारे होणार सन्मान
- रंगाच्या होळीला बेरंग करू नका…