चंद्रपूर महानगराच्या विकासासाठी ५.२६ कोटी मंजूर, पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश
अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
मो: 8830857351
चंद्रपूर, 18 मार्च: चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांचा विकास करण्यासाठी विकास योजने अंतर्गत ५ कोटी २६ लाख रुपये निधीची मान्यता प्रदान करण्यात आली आहे. राज्याचे वन सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. चैतन्य ज्येष्ठ नागरिक संघ सभागृह बांधकामासाठी ६० लाख रुपये, चंद्रपूर शहर महानगरपालिका आहे. अंतर्गत तुकूम गुरुद्वारा समोरील रस्त्यावर प्रवेशद्वाराचे बांधकाम करणे ४५ लाख, विठ्ठल मंदिर प्रभाग क्रमांक १५ मध्ये साईबाबा क्रीडा व व्यायाम प्रसारक मंडळ, चंद्रपूर व्यायाम शाळेचे बांधकाम करण्याकरिता १ कोटी २५ लाख, आंबेडकर नगर प्रभाग क्रमांक १७ येथे तथागत सिद्धार्थ बहुउद्देशीय मंडळ परिसरात व्यायाम शाळेचे बांधकाम करण्यासाठी ८५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
हिंदुस्थान लालपेठ प्रभाग क्रमांक १६ येथे खुल्या जागेला संरक्षण भिंत बांधण्यासाठी व सौंदर्यीकरणासाठी ७० लक्ष, सुगत नगर येथे जनबंधू व बच्चेवार यांचे घरापर्यंत सिमेंट कॉंक्रिट रोडचे बांधकामासाठी १५ लाख, सुगत नगर येथे बारापात्रे ते विडे ते पोहेकर जिमपर्यंत सिमेंट काँक्रिट रोड व नालीचे बांधकामासाठी लॉन ते रणदिवे ते संदीप मोरे ते ढेंगळे रोड व नालीचे बांधकामासाठी १५ लाख, जटपुरा वार्ड, बजाज वार्डाच्या मागील परिसरात सामाजिक सभागृह बांधकामासाठी ४० लाख, तर शास्त्रीनगर प्रभाग क्रमांक २ येथे चव्हाण रॉयल आली आहे. जवळील नाल्यापासून ते डी. आर.सी.रोड पर्यंत सिमेंट काँक्रिट रोडचे बांधकामासाठी २० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे.
दुधानी यांचे घरापासून ते मानसी अपार्टमेंटपर्यंत सिमेंट कॉक्रिट रोड व भूमिगत नालीच्या बांधकामासाठी १० लक्ष, नरेश गर्गेलवार यांच्या घरापासून ते अजय खडसे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रोड व दोन्ही बाजूस नालीचे बांधकाम करण्यासाठी १० लाख, वाघमारे ले-आऊट तसेच भवानी नगर येथील अंतर्गत रस्त्याचे खडीकरण करण्यासाठी १६ लक्ष असे एकूण ५ कोटी २६ लक्ष रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.