राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा
अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
मो: 8830857351
चंद्रपूर,18 मार्च: राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या पदास गृहमंत्रालयाने कॅबिनेट मंत्रीपदाचा समकक्ष दर्जा बहाल करण्यात आला आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून अहीर यांची राष्ट्रपतींनी २ डिसेंबर २०२२ रोजी नियुक्ती केली होती. आता या पदास केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा लागू करण्यात आला आहे. अध्यक्षपदाची जबाबदारी
स्वीकारल्यानंतर हंसराज अहीर यांनी देशातील विविध राज्यातील ओबीसी प्रवर्गातील शासकीय, निमशासकीय, उद्योग, विविध कंपन्या, कोळसा खाण क्षेत्रातील ओबीसी अधिकारी, कर्मचारी, कामगारांचा अनुशेष रोष्टरनुसार भरण्याकरिता सुनावणीद्वारा आढावा घेतानाच ओबीसींच्या सामाजिक,
शैक्षणिक व रोजगार विषयक प्रश्नांबाबत अत्यंत जागरुकतेने कार्य करीत आहे. ओबीसींच्या संवैधानिक अधिकारासाठी राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने ते प्रभावीपणे कार्यरत आहेत. अहीर यांनी यापूर्वी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे ४ वेळा प्रतिनिधित्व केले आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, खासदारकीच्या कार्यकाळात कोल व स्टीलसह अन्य संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष व सदस्य पदावर उल्लेखनीय कार्य केले आहे.