प्रादेशिक जलसंधारण अधिकारीपदी हरिभाऊ कारभारी गिते यांची नियुक्ती जलयुक्त शिवार ही योजना प्रभावीपणे राबवणार : हरिभाऊ गीते

प्रादेशिक जलसंधारण अधिकारीपदी हरिभाऊ कारभारी गिते यांची नियुक्ती

जलयुक्त शिवार ही योजना प्रभावीपणे राबवणार : हरिभाऊ गीते

प्रादेशिक जलसंधारण अधिकारीपदी हरिभाऊ कारभारी गिते यांची नियुक्ती जलयुक्त शिवार ही योजना प्रभावीपणे राबवणार : हरिभाऊ गीते

ज्ञानेश्वर तूपसुंदर
नाशिक तालुका प्रतिनिधी
मो. 8668413946

नाशिक : नाशिकमध्ये प्रादेशिक जलसंधारण अधिकारी म्हणून नाशिकचे जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ कारभारी गीते यांची नियुक्ती झाली . राज्यात विविध ठिकाणी रिक्त प्रादेशिक जलसंधारण अधिकाऱ्यांच्या जागेवर जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. विशेष म्हणजे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणूनही गिते कार्यभार सांभाळत आहेत . राज्यातील आठ प्रादेशिक जलसंधारण अधिकाऱ्यांच्या बढतीचे आदेश मृद व जलसंधारण विभागाने बुधवारी ( दि .१३ ) रोजी जारी केले. हरिभाऊ गीते हे २२ फेब्रुवारी २०२२ पासून नाशिक जिल्हा जलसंधारण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत . अकोला व नाशिकचा कार्यभार सांभाळत असताना ३१ मे २०२३ रोजी काळे यांच्या निवृत्तीनंतर प्रादेशिक जलसंधारण अधिकारी पदाचा अतिरीक्त कार्यभारही त्यांनी सांभाळला . राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार दोनचा आराखडा तयार करुन त्याला मंजूरी मिळवण्यात हरिभाऊ गिते यांचा महत्वपूर्ण सहभाग राहिला . तसेच गाळयुक्त धरण , गाळयुक्त शिवार या अभियानाला त्यांनी गती दिली . पाण्याच्या योग्य नियोजनाशिवाय कृषीचा विकास शक्य होणार नाही . त्यासाठी जलयुक्त शिवार ही योजना प्रभाविपणे राबवण्याचा हरिभाऊ गिते यांचा मानस आहे . या अनुभवाचा फायदा राज्य सरकारला होणार असून प्रादेशिक जलसंधारण अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाल्याने विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गिते यांचे अभिनंदन केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here