“जीवक निवास” एक निमित्त समाजाचे गृहप्रवेश असे आदर्श ठरावेत

"जीवक निवास" एक निमित्त समाजाचे गृहप्रवेश असे आदर्श ठरावेत

“जीवक निवास” एक निमित्त समाजाचे गृहप्रवेश असे आदर्श ठरावेत

"जीवक निवास" एक निमित्त समाजाचे गृहप्रवेश असे आदर्श ठरावेत

✍️ राम भोस्तेकर ✍️
पन्हलघर लोणेरे विभाग
📞 92737 01068 📞

माणगांव :-धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विविध माध्यम आहे. आदरणीय संतोष हाटे यांच्या घराचा रविवार दिनांक 17 मार्च 2024 रोजी गृहप्रवेश सोहळा संपन्न झाला, गृहप्रवेश हा माझ्यासाठी निमित्त मात्र होता, त्यांच्या चरथ भिकावे या आदरणीय स्वभावाला यासाठीच प्रत्येक्षात गृहप्रवेश दिनी भेटून सदिच्छा दिल्या त्याला दोन कारणे आहेत त्यांनी आपल्या घराचे नाव “जीवक निवास” असं नाव ठेवले ही धम्म संस्कृतीची मनाला लागलेली तहान त्यांची मोठी आहे. रायगड जिह्यातील गोरेगाव विभागातील 32 गावं मिळून जोडले गेलेल्या “पंचशील बौद्धजन सेवा संघ” या संघातील जेष्ठ आजी माजी विश्वस्त कार्यकर्ते सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते, उल्वे नवी मुंबई या राहत्या नगरातील स्थानिक बौद्ध समाज “बहुजन बौद्ध बांधव सामाजिक संस्था” या संस्थेचे उपासक उपासिका यांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती, कार्यक्रमाचे बौद्ध उपासक आदरणीय विजय हबळे बौद्धजन पंचायत समिती आणि बौद्ध महासभा या दोन्ही संस्थेचे आदरणीय गावं नागाव स्थानिक व मुंबईचे लहान थोर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्या कष्ट घेतले, भावंडांनो पूर्वी आपल्या वस्त्यांना नावे नव्हती आधी त्या त्या जातींची नाव आणि त्या नावांना जोडून वाडी, वाडा, पुरा असा शब्द जोडला जायचा आता त्याबद्दल्यात भीमनगर, सिद्धार्थ नगर, आनंद नगर, गौतम नगर अशी उजेड वाटणारी नावे वस्त्यांना मिळाली, पूर्वी आपल्या घरांना नावे नसतं आता तक्षशीला निवास, लुंबिनी, नालंदा, वैशाली, मिलिंद, रमाई निवास अशी सुंदर नावे घरांना दिली जाऊ लागली, हेच मुला मुलींच्याही नावांच्या संदर्भात घडले. या गृहप्रेवश निमित्याने आपल्या निवासाला “जीवक निवास” नाव देऊन आदरणीय संतोष हाटे यांनी हाच वसा जीवापाड जपण्याचा आणि इतरांना यातून हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

आदरणीय संतोष हाटे हे क्रांतीभूमीतील गाव नागाव या गावचे सुपुत्र आहेत आणि बौद्ध उपासक आहेत ज्ञान दानाचे त्यांचे अविरात्र चाललेलं कार्य मी स्वतः पाहात आलो आहे. या निवसाच्या निमित्त्याने हे नाव त्यांनी आपल्या निवासाला देण्यामागची त्यांची भूमिका तशीच राहिली आहे. जीवक हा सालवतीचा अनौरस पुत्र, सालवती ही राजगृहाची गणिका होती, तीने या मुलाला उकिरड्यावर फेकले हे मूल याही उपेक्षेच्या उकिरड्यावर जगत होत त्याचे नाव त्यामुळेच जीवक ठेवण्यात आले होते जीवक म्हणजे चिवट कोणत्याही परिस्थितीत हिंमतीने जगणारा जगणं फुलविणारा म्हणजे जीवक, मरणाच्या गर्दीतही जगणं फुलवितो तो जीवक, या जीवकाने तक्षशिला विद्यापीठात शिक्षण घेतलं, जीवक पुढे शिकून मोठा ख्ख्यातिप्राप्त डॉक्टर झाला तो एक आदरणीय भिकू होताच, जीवकाला त्याच्या आईने उकिरड्यावर फेकलं खरं पण आपल्या सर्वांनाच इथल्या अमानुष संस्कृतीने उकिरड्यावर फेकले होते या उकिरड्यावरून आपणाला डॉ बाबासाहेब आंबेडकर नावाच्या आपल्या नायकाने पोटाशी धरले, क्रांतीचे बाळकडू पाजले, आपणही असे जीवकच, परिस्थितीपुढे न वाकता परिस्थितीला जीवकच, प्रश्न काही दिवसांचा होता पण बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थानात संस्थेने बाबासाहेबांना शिकण्यासाठी देऊ केलेल्या शिशुववृत्ती परतफेड निमित्त बाबासाहेब नोकरीला गेले असता तेथे खोली भाड्यांनी मिळावी म्हणून केलेली पायपीठ, जातीमुळे त्यांची झालेली अव्हेलना आपल्या सर्वांना माहिती असेल पारशी हॉस्टेलमध्ये स्वतःचं आडनाव त्यांना बदलून एदोलालजी असं ठेवावं लागलं आणि पुढे काय झालं हा तपशील आपल्याला माहिती आहे. आज आपल्याला जे सुख समाधान आणि सन्मान मिळत आहे ते बाबासाहेबांचे कष्ट आणी त्यागामुळे ही संधी मिळाली आपण देशाच्या कोण्याही राज्यात शहरात खेड्यात स्थायिक होऊ शकतोय या विकासाला कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत ही जाणीव त्यांना आहेच आंबेडकर समाजातील या नव्या मध्यमवर्गावर फार मोठी जबाबदारी ही आहे की त्यांने सर्वच पीडितांना बुद्धाच्या मनाने असं जवळ घेतले पाहिजे. आपल्या प्राप्तीचा निदान 20 वा हिस्सा या कमी देईन असा निश्चय करावा मला सर्वांना बरोबर बरोबर न्यावयाच आहे असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. बाबासाहेबांचे हे ध्येय आंबेडकरी समाजातील मध्यमवर्गीयांनी आपले ध्येय मानले पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्या बंगल्याला 1935 साली राजगृह हे नाव दिल, प्रिंटिंग प्रेसला बुद्ध भूषण, कॉलेजला सिद्धार्थ कॉलेज, आनंद भवन आणि मिलिंद कॉलेज नाव दिले आहे. ही उजेडाची बांधणी बाबासाहेबांनी आपल्या हयातीत केली आहे हे आपण काळजीपूर्वक समजून घेणे गरजेचे आहे.

याही निमित्याने आयुष्यातील प्रत्येक क्षणाला अर्थ देत जगण्याची कला त्यांच्या ठाई आहे, क्रांतीभूमीतील नागांव या वैभवशाली नागवंशीय समृद्धी प्राप्त गावचे ते सन्मानीय सुपुत्र आहेत त्यांचे हे स्वप्नातील घर प्रत्येक्षात समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमुख उपस्थितांच्या साक्षीने गृहप्रवेश करून आज प्रत्येक्षात उतरले येच्छ बुद्धा अतिताच्य या बुद्ध वाचनाने गृहप्रवेश झाला, स्वप्न बघणं आणि स्वप्न जागणं, तसे पाहता जबाबदाऱ्या वैगरे हे सगळं जन्मत:च असतात त्यामुळे त्या कुठल्याही प्रसंगी आपल्याला पेलाव्याच लागतात. कुटूंब, नोकरी सांभाळून मिळालेला वेळ समाजाचे आपण देणे लागतो ही जाणीव अंगी असल्यामुळेच गावाच्या सरहद्दी पार करून माणसात धम्म संस्कृती जागृत ठेवणारे हे महान व्यक्तिमत्व मला नेहमी आदरणीय वाटत आलं आहे त्याला हेच कारण आहे. मी त्यांना समाज बंधू मानतो. त्याला हेही कारण आहे कोणतेही नाते हे आपल्या जगण्यावर प्रभाव पाडणाऱ्या अर्थपूर्ण आनंदाचा एक भाग असतं. आदरणीय संतोष हाटे यांच्याशी जोडले गेलेले नाते हे आयुष्यभर आनंद देणारे असे नाते आहे. या गृहप्रवेश निमित्याने संदीप महाडिक यांनी आपले सदिच्छा भाषण केलं त्याचं बरोबर अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं रामदास हाटे – स्थानिक भावकी अध्यक्ष, सुनील म. हाटे, दिनेश हाटे अध्यक्ष – आणि कालच्या प्रोग्रामचे अध्यक्ष, नरेंद्र हाटे, अशोक जाधव, अपेक्षा अशोक जाधव, प्रदिप शिंदे, मधुकर रगडे – अध्यक्ष बहुजन बौध्द बांधव सामाजिक संस्था उलवे नोड, नरेंद्र पवार, विनिता बर्फे, मुकुंद पवार, संतोष साळवी – पंचशील मुंबई अध्यक्ष, सिद्धार्थ शिंदे, या कार्यक्रमाला गावावरून खास पंचशील बौध्दजन सेवा संघाचे विश्वस्त अध्यक्ष विकास गायकवाड, तसेच अशोक रघुनाथ साळवी ( विश्वस्त), भूषण जाधव हे उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रम दिनेश सुधाकर हाटे – नागावकर हितवर्धक मंडळ मुंबई अध्यक्ष, पंचशील बौध्दजन सेवा संघ विश्वस्त यांच्या अधिपत्याखाली संपन्न झाला.