चोळे येथे शिवजयंती सोहळा उत्सहात संपन्न 

चोळे येथे शिवजयंती सोहळा उत्सहात संपन्न 
✍️मंजुळा म्हात्रे ✍️
नागोठणे शहर प्रतिनिधी
मो :- 9284393448

नागोठणे : अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची३९५वी जयंती तिथीनुसार सोमवार दि. १७ मार्च रोजी चोळे टेप येथे मोठया उत्सहात संपन्न झाली. त्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी दिपप्रज्वलन करून महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून महाआरती करण्यात आली. तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचे सत्कार करण्यात आले, रात्री ठीक ९ वाजता शिवरत्न भूषण एकच राजा इथे जन्मला फेम गायक रोहित पाटील प्रस्तुत ऑकेस्टा शिवजल्लोष, रामदास निघाली रेवसबंद्रावरी, खंदेरीच्या माझ्या येताल देवा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन शिवसेना संपर्क प्रमुख प्रसाददादा भोईर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या वेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना रायगड जिल्हा समन्वयक नरेश गावंड, शिवसेना तालुका प्रमुख जगदीश ठाकूर, विधानसभा समन्वयक समीर म्हात्रे, तालुका संपर्क प्रमुख बी. एच. पाटील, शिवसेना उपजिल्हा संघटिका दर्शना जवके, नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी, शेतकरी संघर्ष समिती अध्यक्ष अनंत भूरे, माजी सरपंच भास्कर म्हात्रे,माजी उपसरपंच, घनश्याम कुथे,गणपत खाडे, विजय पाटील,मनोज मोकल प्रकाश म्हात्रे, नितीन पाटील,डॉ. व्ही. आर. शिंदे, डॉ. अंकित भोईर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना शिहू विभाग प्रमुख दिपक पाटील मित्र मंडळ शिवसेना शाखा, शिवप्रेमी ग्रुप, व ग्रामस्थ मंडळ चोळे टेप यांच्या वतीने करण्यात आले होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तरुणांनी विशेष मेहनत घेतली.