म्हसळा शहरात शिवजयंती उत्सव दिमाखात साजरा

म्हसळा शहरात शिवजयंती उत्सव दिमाखात साजरा

✍️निखिल सुतार ✍️
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞 70839 05133📞

म्हसळा – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसळा तालुक्यातील दिघी नाका येथील चौकात राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करून शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. फाल्गुन वद्य तृतीया शके १९४६ तिथीनुसार पार पडलेल्या या उत्सवात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपारिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

उत्सवाच्या ठिकाणी किल्ले दुर्गराज रायगड ते म्हसळा अशी मशाल ज्योत प्रज्वलीत ठेवून, पालखी सोहळा, महाड येथील शिवतांडव ढोल पथकाच्या ताशाच्या गजरात, झांज पथकाच्या वादनात आणि फटाक्यांच्या आतषबाजीने वातावरण अद्भुत बनले होते. बालकलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, महाराणी येसूबाई आणि स्वराज्याचे शिलेदार यांची पारंपरिक वेशभूषा धारण करून घोडागाडीच्या रथातून भव्य मिरवणूक काढली.

शिवसेना आणि गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान यांनी एकत्र येऊन आयोजित केलेल्या या उत्सवात चॅम्पियन कराटे क्लब श्रीवर्धन – म्हसळा यांच्याकडून बनाठी खेळ, ढाल तलवारबाजी प्रात्यक्षिके आणि विविध चित्त थरारक मनोरे सादर करण्यात आले. म्हसळा नगरीतील शिवभक्त मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी झाले होते.

उत्सवाच्या आयोजनात गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन करडे, शिवसेना तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले, शिवसेना उद्धव ठाकरे तालुका प्रमुख सुरेश कुडेकर, शहर प्रमुख विशाल सायकर व श्री.पवन भोई,युवासेना तालुका अधिकारी कौस्तुभ विलास करडे व स्वप्नील चांदोरकर शहर संघटक अभय कलमकर उपतालुकाप्रमुख श्री.प्रवीण बनकर व श्री हेमंत नाक्ती, आणि अन्य शिवसैनिकांची मेहनत मोठ्या प्रमाणावर दिसून आली.

शिवजयंती उत्सवाला नगराध्यक्ष संजय कर्णिक, हिंदू संघटना तालुका अध्यक्ष समीर बनकर, माजी सभापती महादेव पाटील, भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य शैलेश पटेल, श्री. प्रसन्न निजामपूरकर,तालुका अध्यक्ष तुकाराम पाटील, महिला आघाडी सौ.रीमा महामुनकर आणि सौ . गौरी करडे इतर मान्यवरांच्या उपस्थितीमुळे उत्सवाला अधिक रंगत मिळाली.

शिवराजांची भूमिका निकेश कोकचा यांनी साकारली, ज्यामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.