विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यावर हिंगणा एमआयडीसी पोलिसांची धडक कार्यवाही.

53

✒मुकेश चौधरी, विदर्भ ब्युरो चीप✒
नागपुर,दि.18 एप्रिल:- महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या कोरोना वायरस बांधीत रुग्णांमुळे महाराष्ट्र शासनाने राज्यात 30 एप्रिल पर्यंत कडक लॉक डाऊनची घोषणा करून 144 कलम लागू करुन संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवून आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, गर्दी करू नका, मास्कचा वापर करा, असे आवाहन एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांमध्ये सध्या जनजागृती केल्या जात आहे.

एमआयडीसी पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनात सकाळ पासुन हिंगणा मार्गावर हिंगणा नाका, सीआरपीएफ गेट आणि वानाडोंगरी परिसरात नाकाबंदी लावण्यात आली. शहरात जाणाऱ्या वाहनधारकांची कसून चौकशी केल्यानंतरच त्यांना शहरात प्रवेश देण्यात आला. तसेच नागपूर शहरातून ग्रामीण भागात जाणाऱ्या नागरिकांना सुद्धा कामाचे ठिकाण व ओळखपत्र विचारण्यात येत होते. विनामास्क फिरणारे, फिजिकल डिस्टनसिंगचे उल्लंघन करणारे आणि विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनचालकावर दंडात्मक कार्यवाही केल्या जात आहे. एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधिकारी मुसळे, राजूरकर, वीजय, सचिन, पंकज यांच्या कार्यवाहीमुळे दररोजच्या तुलनेत हिंगणा मार्गावर वाहतूक निश्चितच आज कमी दिसत होती.