ब्रम्हपुरी बेड न मिळाल्याने प्रवासी निवाऱ्यात उपचाराअभावी कोरोना ग्रस्ताचा मृत्यू.

अमोल माकोडे, ब्रम्हपुरी प्रतिनिधी

ब्रम्हपुरी:- येथील ख्रिस्तानंद चौकात असलेल्या प्रवासी निवाऱ्यात आंभोरा येथील एका 34 वर्षीय युवकाचा कोरोनाच्या उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली आहे.

सध्या कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. दवाखान्यात कोठेही बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांना दारोदार फिरून शेवटी दम दोडण्याची वेळ येत आहे. अशी घटना आज ब्रम्हपुरीत घडली आहे. आंभोरा तालुका-भिवापूर येथील एक 34 वर्षीय तरुण कोरोना संक्रमित असल्याने त्याने आपल्या परिसरातील दवाखान्यात भटकंती केली पण बेड शिल्लक नसल्याने त्याला त्याच्या घरच्या लोकांनी ब्रम्हपुरी येथे शनिवारी आणले मात्र ब्रम्हपुरीत दवाखान्यात बेड शिल्लक नसल्याने त्यांनी शेवटी प्रवासी निवाऱ्याचा आधार घेत कोठेतरी सोय होईल या आशेने थांबले होते या प्रकरणाची माहिती ब्रम्हपुरीतील नागरिकांनी तहसीलदार विजय पवार यांना देताच उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी घटनास्थळी धाव घेतली व स्वतः तहसीलदार विजय पवार यांनी रुग्णवाहिका बोलवून त्याची कुठेतरी सोय करून त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केले पण रुग्णवाहिका येण्यापूर्वीच त्याने प्राण सोडला व सर्वत्र मन सुन्न झाले होते.

ख्रिस्तनांद रुग्णालयातील डॉ. कडून शहानिशा करून नगरपरिषद चे कर्मचारी सदर इसमाचा मृतदेह अंत्यसंस्कार साठी घेऊन गेले. अश्या घटना पुन्हा घडू नये यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या घटनेची गांभीर्यात लक्षात घेऊन उपचारासाठी अभावी कोणाचा जीव जाऊ नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरीक करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here