कोरोना रिपोर्ट आला निगेटिव्ह, तरी 24 तासांत तीन सग्या भावांचा तडफडून मृत्यू.

दिल्ली,दि.18 (प्रतिनिधी):- कोरोना वायरस ने संपुर्ण देशात हाहाकार माजवला आहे. उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना वायरसचा प्रकोप दिसुन येत आहे. देशात रोज लोखो कोरोना वायरस बांधीत रुग्ण मिळुन येत आहे. त्यामुळे सर्वीकडे हाहाकार माजला आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथून एक खळबळजनक आणि मन हेलवनारी बातमी समोर येत आहे. एकाच कुटुंबातील तीन भावांचा 24 तासांत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तिघा भावांना आठवडाभरापासून ताप होता. मात्र गेल्या 24 तासांना तिघांना श्वास घेण्यास अडचण होऊ लागली आणि एक-एक करून तिघांचाही मृत्यू झाला.

तिघा भावांच्या लागोपाठ मृत्यूमुळे प्रशासन सतर्क झाले असून त्यांच्या कुटुंबियांना आयसोलेट करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान, तिन्ही भावांचे वय 53, 50 आणि 45 असे होते. याबाबत माहिती देताना डॉक्टरांनी सांगितले की, तिघांना न्यूमोनियाचा त्रास झाला होता आणि त्यांची तब्येत वेगाने खालावत होती. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते. मात्र तब्येत अधिकच खालावल्याने गेल्या 24 तासात तिघांचा पाठोपाठ मृत्यू झाला. सर्वात मोठ्या भावाचा मृत्यू घरी, तर दोघांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आली होती.
हे तिघे भाऊ व्यवसायीक होते, आणि त्यांनी कोरोना चाचणीही केली होती. मात्र ही चाचणी निगेटिव्ह आली होती. प्राथमित अंदाजानुसार तिघांचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसावा असे लखीमपूर खिरीचे सीएमओ मनोज अग्रवाल यांनी सांगितले. मात्र शवविच्छेदन अहवालानंतर सर्व काही स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here