नातेवाईकांनीच उचलला कोरोना बांधीत रुग्णांचा मृत्यूदेह, वर्धा जिल्हातील समुद्रपूर ग्रामीण रुग्णालयातील प्रकार.

52

✒प्रशांत जगताप, प्रतिनिधी✒
वर्धा,दि.18 एप्रिल:- वर्धा जिल्हातील समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आरोग्य विभागा मोठ्या प्रमाणात सुरु असलेला हलगर्जी कारभार पुन्हा चवाट्यावर आला आहे.

वर्धा जिल्हातील समुद्रपूर तालुक्यातील बरबडी गावातील एका व्यक्तीचा शुक्रवारी दुपारी 2 वाजताचा सुमारास कोरोना वायरसमुळे ग्रामीण आरोग्य रुग्णालयात मृत्यू झाला. कोरोना वायरसने मृत्यू झाला हे माहित असतांना समुद्रपुर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचा-यांनी मृतदेह रुग्णालयातून हिंगणघाट येथे अंतसंस्कारासाठी नेण्यासाठी नातेवाइकांना उचलण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

समुद्रपुर आरोग्य रुग्णालयात सुरु असले हा हलगर्जी पणा बघुन एका सामाजिक कार्यकर्त्यांनी येथील महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांची चांगलेच सुनवले. यावर या महिला डॉक्टररांनी हे आमच काम नाही, हे तर नातेवाइकांचेच काम आहे असे उत्तर दिल्याने वातावरण अधिकच तापले होते.
अखेर नातेवाइकांनी मृतदेह उचलून स्वत:च्या हाताने स्वर्गरथात ठेवला. येथून हा मृतदेह हिंगणघाट येथील मोक्ष धामावर अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. या संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली.