राजुरा तालुक्यातील पात्र लाभार्थींना तत्काळ शिलाई मशीन वाटप करा.

54

राजुरा तालुक्यातील पात्र लाभार्थींना तत्काळ शिलाई मशीन वाटप करा.

जिल्हा परिषदेच्या दुर्लक्ष पणामुळे राजुरा तालुक्यात पात्र महिला शिलाई मशीन पासून वंचित. घनश्रमिक एल्गार चे उपाध्यक्ष शाम मेश्राम यांची मागणी.

राजुरा तालुक्यातील पात्र लाभार्थींना तत्काळ शिलाई मशीन वाटप करा.
राजुरा तालुक्यातील पात्र लाभार्थींना तत्काळ शिलाई मशीन वाटप करा.

तिरूपति नल्लाला
राजुरा, विरूर ग्रामीण प्रतिनिधि

राजुरा:- एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयामार्फत शिलाई व पिको फाल मशीन ग्रामीण भागातील मुली व महिलांना 90 टक्के अनुदानावर वाटप करण्याची योजना कार्यान्वित असून सदर योजनेसाठी सहा महिन्या पूर्वी राजुरा तालुक्यातील गरजू व प्रशिक्षित महिलांनी अर्ज दाखल केले.

सदर योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाने अंगणवाडी सेविकांना दिले होते. त्या प्रमाणे अनेक महिलांनी अर्ज दाखल केले. सदर योजनेसाठी जिल्हा परिषद सर्कल चूनाला- विरुर स्टे. मधून 27 अर्ज पात्र असून, आर्वी- पाचगाव सर्कल मधून 22 अर्ज, देवडा- डोंगरगाव सर्कल मधून 13 अर्ज, गोवरी- सास्ती सर्कल मधून 46 अर्ज, पात्र असून सहा महिने लोटूनही सदर योजना महिलांना मिळालेली नाही.

यावरून जिल्हा परिषदेच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. कोरोना च्या महारित राज्य सरकर लॉकडाउन चा निर्णय घेतलेला असून सदर योजना महिलांना मिळाली असती तर अनेक महिलांना घर बसल्या व्यवसाय करता आले असते मात्र जिल्हा परिषद जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने महिला सदर योजनेपासून वंचित असल्याचे मत श्रमिक एल्गार चे उपाध्यक्ष घनशाम मेश्राम यांनी व्यक्त केले आहे. सदर योजना शासनाने तत्काळ पात्र लाभार्थींना देण्यात यावे अशी मागणी मेश्राम यांनी केली आहे.