वरोरा- भद्रावती विधानसभेतील आरोग्य केंद्र व उपकेंद्रात लस उपलब्ध करून द्या.
वरोरा- भद्रावती विधानसभेतील आरोग्य केंद्र व उपकेंद्रात लस उपलब्ध करून द्या.

वरोरा- भद्रावती विधानसभेतील आरोग्य केंद्र व उपकेंद्रात लस उपलब्ध करून द्या.

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना लोकहितकारी सूचना.

वरोरा- भद्रावती विधानसभेतील आरोग्य केंद्र व उपकेंद्रात लस उपलब्ध करून द्या.
वरोरा- भद्रावती विधानसभेतील आरोग्य केंद्र व उपकेंद्रात लस उपलब्ध करून द्या.

मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:- मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू पडणाऱ्या कोरोना बाधित व्यक्तीच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सध्या या विषाणूपासून बचावाकरिता लस एकमात्र पर्याय आहे. वरोरा – भद्रावती विधानसभेतील ग्रामीण भागातील लोकांना लस घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी यावं लागत त्यामुळे त्यांना आरोग्य केंद्र व उपकेंद्रात लस देण्याची सुविधा करण्याची लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना केली आहे.

जिल्ह्यातील वरोरा- भद्रावती विधानसभेत मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांची संख्येत वाढ होत आहे. दिवसेंदिवस या विधानसभेतील व्यक्ती कोरोना बाधित होत आहे. त्यामुळे वरोरा तालुक्यातील चार आरोग्य केंद्र व २८ उपकेंद्र तसेच भद्रावती तालुक्यातील पाच आरोग्य केंद्र व २९ उपकेंद्रात लस उपलब्ध करण्याची लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली आहे. या केंद्रावर लस उपलब्ध झाल्यास मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील लोकांची होणारी गैरसोय थांबणार आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालय येथे हि लस देण्यात येते. परंतु ग्रामीण भागात उपलब्ध नसल्यामुळे सर्वाना उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे यावे लागते. त्यामुळे या ग्रामीण भागातील लोकांची पैशाची व वेळेचा अपव्यय होत असतो. येथील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येत असल्याचे दिसून येत आहे.

सर्वत्र पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात मृत्यू दर वाढत आहे. हि चिंतेची बाब आहे. या काळात योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामध्ये खासगी रुग्णालयाची यंत्र सामुग्री घेऊन खासगी डॉक्टरांची सेवा घेतली पाहिजे. या माध्यमांतून वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करणे देखील सोईचे होणार आहे. त्यामुळे वरील सर्व बावी तातडीने अमलात आणण्याच्या सूचना त्यांनी केल्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान थांबविण्यासाठी सर्वानी योग्य नियोजन करून टीम वर्क करून रुग्णाची व स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here