आता वर्धेत तयार होणार रेमडेसिव्हिर; गंभीर रुग्णांवर वेळेत होणार उपचार.

मुकेश चौधरी, विदर्भ ब्युरो चीप✒
वर्धा,दि.18.एप्रिल:- आज संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. रोज हजारो कोरोना वायरस बांधीत रुग्णांची वाढ होत आहे. अनेकांना कोरोना मुळे आपला जीव गमवावा लागत आहे. मात्र रेमडेसिव्हिर इंजेक्शन ही कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे. तर काही समाजद्रोही, भष्ट्राचारी लोकं कोरोना बांधीत रुग्णांच्या टाळूवरील लोणी खाऊन रेमडेसिव्हिर इंजेक्शन काळाबाजार करत आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. पण आता एक दिलासादायक माहिती समोर येतेय. आता रेमडेसिव्हिरचं उत्पादन आता वर्धा येथे होणार आहे.

विदर्भात असलेली कोरोना वायरसची स्थिती पाहता आणि रेमडेसिव्हिर इंजेक्शनची तुटवडा बघता वर्ध्याच्या ‘जेनेटेक लाईफ सायन्सेस’ला 30 हजार वायल प्रतिदिन रेमडेसिव्हिर इंजेक्शन तयार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याबद्दल सातत्यानं पाठपुरावा करत होते.

रेमडेसिव्हिर तयार करणाऱ्या गिलेड कंपनीने सात कंपन्यांना हे इंजेक्शन तयार करण्याची परवानगी दिली होती. त्यातील एक कंपनी ‘लोन लायलंस’द्वारा जेनेटिक लाईफ सायन्स रेमडेसिव्हिर इंजेक्शन तयार करेल. साधारण एका आठवड्यात वर्ध्यात रेमडेसिव्हिर उत्पादन सुरू होईल आणि पंधरा दिवसांत 30 हजार वायल प्रतिदिन इंजेक्शन्स उपलब्ध होणार आहेत अशी माहिती देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here