यानिमित्त हनुमान मंदिरात भजन पूजन करून तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित
श्री प्रदीप मनोहर खापर्डे
कान्पा ग्रामीण प्रतिनिधी
मो. न.८३२९०८४४३२
कान्पा: नागभीड येथील शिवाजी चौक इथे असलेल्या हनुमान मंदिरात शनिवारी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. तसेच हनुमान जयंतीच्या कार्यक्रमात भाविकामथे मोठा उत्साह दिसून आला. यावेळी महिलांनी उत्साहाणे मंदिरासमोर रांगोळ्या काढून रामायणातील जीवन दर्शन घडवले होते.
यानिमित्त हनुमान मंदिरात भजन पूजन करून तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी हनुमान मंदिर देवस्थान चे पदाधिकारी व हनुमान जन्मोत्सव चे कार्यकर्ते श्री गजानन पिसे, श्री सुरेश काबडी , श्री धनराज काटे खाये, श्री जांगिर भाई कुरेशी, श्री मंगेश पिसे, श्री विजय अमृतकर, श्री नितीन सेलोकर, श्री हकीम शेख उपस्थित होते.