डोगरगाव (बु.) येथील अवैध दारू विक्री बंद करण्याची होतेय मागणी

55

गावात सुरू असलेल्या दारू विक्रीमुळे लहान मुले तसेच तरुण दारूच्या आहारी जात असल्याने ग्रामस्थांची मागणी

डोगरगाव (बु.) येथील अवैध दारू विक्री बंद करण्याची होतेय मागणी

श्री प्रदीप मनोहर खापर्डे
कान्पा ग्रामीण प्रतिनिधी
मो. न.८३२९०८४४३२

कान्पा – नागभीड ठाण्याअंतर्गत येत असलेल्या डोगरगाव (बु.) या गावांत सुरु असलेल्या अवैद्य दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीसाठी डोंगरगाव बुजरूक येथील महिला व पुरुष यांनी पोलीस स्टेशन नागभीड येथे येऊन गावातील अवैध दारूविक्री आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

डोंगरगाव बु.येथे अवैधरित्या दारू विक्री केली जात आहे. गावात सुरू असलेल्या दारू विक्रीमुळे लहान मुले तसेच तरुण दारूच्या आहारी जात आहेत. शिवाय गावात भांडण, तंट्याचे. ंप्रमाणे वाढत आहेत. यामुळे गावाची शांतता भंग होत असून धार्मिक भावनाही दुखावल्या जात आहेत.