सरपंच बाईच्या पतीची महिला सदस्य यांच्या घरी जाऊन गुंडागर्दी

51

साकोली जवळील शिवणीबांध ग्रामपंचायतीमधील घटना 

आशिष चेडगे
साकोली तालुका प्रतिनिधी
8605699863

साकोली : जवळील शिवणीबांध येथे ग्रामपंचायत सरपंच यांचा पती सुधाकर तुळशीराम उईके याने अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला सदस्य यांच्या घरी जाऊन शिवीगाळ आणि मारण्याची धमकी दिली असून आरोपी विरुद्ध साकोली पोलीसांत गुन्हा दाखल झाला. 

ग्रामपंचायत शिवणीबांध येथे एक वर्षाअगोदर ग्रामपंचायत निवडणूक संपन्न झाले त्यांमध्ये अनुसूचित जमाती सरपंच महिला साठी राखीव सिट निघाली.आणि पुस्तकला सुधाकर उईके हि महिला सरपंच झाली.शिवणीबांध ग्रामपंचायत येथे ९ सदस्य आहेत.दिनांक १६ एप्रिलला दुपारी १२ च्या सुमारास ग्रामपंचायतची मासिक मिटिंग सुरू झाली त्यांमध्ये सर्व सदस्य यांच्यामध्ये ग्रामपंचायतच्या विकासकामावरून आणि अनेक मुद्यावर वाद-विवाद झाला आणि नंतर सर्व सदस्य आपापल्या घरी निघून गेले.

सरपंच पुस्तकला सुधाकर उईके यांचा पती सायंकाळी अनुसूचित जाती प्रवर्गातील एक ग्रामपंचायत महिला सदस्य यांच्या घरी जाऊन सदस्य महिला यांच्या आईला “तुमची पोरगी कोठे गेली” म्हणत अश्लील भाषेत शिवीगाळ केली.यावेळी महिला सदस्य ह्या दळण लावायला गेल्या होत्या घरी आल्यानंतर महिला सदस्य यांच्या आई आणि सून यांनी त्यांना या घटनेबाबद सांगितले आणि महिला सदस्य उपसरपंच यांच्या घरी माहिती देण्यासाठी गेले तेव्हा आरोपी सुधाकर उईके हा पुन्हा सदस्य महिला यांच्या घरी येऊन पुन्हा शिवीगाळ करायला लागला.

 

या ट्रेंडिंग बातम्या आपण वाचलात का?

 

त्यावेळी घराजवळील यांनी त्याला सांगितले की,महिला सदस्य यांची आई आणि सुन घरी आहे आणि तू कोणत्या भाषेत शिवीगाळ करीत आहेस. याबाबद साकोली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून आरोपी सुधाकर उईके यांच्या विरुद्ध कलम ४४८, ५०४ आणि ५०६ अंतर्गत  गुन्हा दाखल झाला आहे. याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांचे मार्गदर्शनात पोलीस नायक चेटूले अधिक तपासात आहेत.