बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
मो:8830857351
चंद्रपूर,18 एप्रिल:सर्वोदय महिला मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन, बालाजी वार्ड येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती शुक्रवार १४ एप्रिल रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर, समान संधी केंद्रा अंतर्गत उत्साहात साजरी करण्यात आली. मान्यवरांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार व पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमात बजाज तंत्रनिकेतन चे प्राचार्य सतीश ठोंबरे सह सर्व प्राध्यापकगण उपस्थित होते. या प्रसंगी सर्वांनी भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. मालखेडे यांनी केले.