“रामजन्मोत्सव म्हसळा तालुक्यात सर्वत्र मोठय़ा
उत्साहात साजरा.
✍️संतोष उध्दरकर. ✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞
.म्हसळा :म्हसळा शहरातील श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सव मोठय़ा उत्साहात संपन्न झाला. यावेळी श्री राममंदिरात सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी श्रींची विधिवत पूजा करून रामजन्मोत्सवाला सुरुवात झाली. यावेळी रोहा येथील सुप्रसिद्ध किर्तनकार श्रीमती भावे यांचे रामजन्मोत्सवावर प्रवचन-कीर्तन झाले, यावेळी मोठय़ा संख्येने भक्तगण भजन-कीर्तनात रमले होते.तसेच साईसेवा ट्रस्ट देवघर याच्या माध्यमातून साई मंदिरात रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी, श्री साईराम यांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात भाविकांनी एकच गर्दी केली होती. येथे ही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी काकड आरती, अभ्यंगस्नान,श्री रामजन्मोत्सव,महाआरती, दुपारी महाप्रसाद,दिलीप शिंदे यांचे सुस्वर भजन,सांज आरती असे भरघोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, अनेक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला, मंदिराच्या भोवती आकर्षक फुलांची सजावट व रोषणाई मुळे मंदिर अधिक आकषिर्त दिसत होते.तसेच खरसई,रेवली ईथे देखील रामनवमी निमित्ताने साई भंडारा आयोजित करून येणाऱ्या भाविकांचे मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात येत होते.