कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या माध्यमातून मोफत सरबत व सोलर दिवे वाटप
✍️ दिलीप करकरे ✍️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞7208708456📞
माणगाव : सतत सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेली व आपल्या मार्फत जनसेवा व्हावी या उद्देशाने , आपल्या तालुक्यातील समाजबांधवांना फायदा व्हावा या हेतूने काम करणारी संघटना कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या माध्यमातून माणगाव तालुक्यातील नागाव या गावी संस्थेच्या वतीने नागाव गावची ग्रामदेवता नवसाला पावणारी आई बाळजाई मातेच्या यात्रे निमित्त व हनुमान जन्मोत्सव निमित्त मोफत सरबत व मोफत सोलर दिवे वाटप करण्यात आले.
सालाबादप्रमाणे याही वर्षी आई बाळजाई मातेच्या यात्रा आणि हनुमान जन्मोत्सव निमित्त दरवर्षी संस्थेच्या वतीने मोफत सरबत वाटप करण्यात येत असतो ह्या उपक्रमासाठी संस्थेचे मुख्य विश्वस्त मा. श्री. निलेश जी तुकाराम सत्वे साहेब, यांचे मोलाचे सहकार्य लाभले .
त्या बरोबर श्री नितीन द कासरेकर , श्री. महेश के महादे, श्री. मधुकर द मोरे, श्री. सचिन मोरे, श्री सुरेश कासरेकर , श्री . राजेंद्र उढरे , श्री महेश कासरेकर ( गुरुजी ), श्री. मेहुलभाई मेहता, योगेश भोईर, सौ. सुनंदा कासरेकर, सौ . प्रार्थना कासरेकर यांच्या सहकार्याने संपन्न झाले .
सरबत वाटपा दरम्यान ग्रामीण समाजबांधव श्री भारत भागोजी उंढरे यांचे सुध्दा मोलाची मदत मिळाली त्याचं प्रमाणे श्री. विनायक उंढरे, श्री. गणेश उंढरे , श्री दशरथ भोईर, श्री राजेश मोरे, श्री रोहीदास भोईर यांचे सुध्दा सुध्दा सहकार्य लाभले.
आई बाळजाई मातेच्या भक्तांनी मोठया प्रमाणात त्यांचा आस्वाद घेतला त्याचप्रमाणे सोलर दिवे संस्थेच्या वतीने वाटप करण्यात आले . नागाव गावातील गरजूवंत विद्यार्थ्यांना व गरजूवंताना वाटप करण्यात आले. त्यावेळेस श्री . यशवंत कासरेकर ( सरपंच नागाव ) श्री . महेश महादे, श्री . सचिन मोरे, श्री . महेश कासरेकर, ( गुरुजी ) श्री . भारत उंढरे ,श्री. नयन उंढरे, श्री. विकास
उंढरे, यांच्या उपस्थितीत गावातील जवळ जवळ १५ जणांना सोलर दिवे वाटप करण्यात आले.