स्टेशन ठाकूरवाडी येथे ट्रॉलीबॅग मध्ये महिलेचा मृतदेह सापडला
कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल
✍🏻 दिनेश सुतार ✍🏻
कर्जत, प्रतिनिधी
मो.9764605917
कर्जत :- दि. १६ एप्रिल २०२५ रोजी दुपारचे १२.३० वाजण्याचे सुमारास कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील स्टेशन ठाकूरवाडी गाव हद्दीतील मुंबई – पुणे जाणाऱ्या डाऊन रेल्वे रुळाचे शेजारी एक ट्रॉलीबॅग मध्ये एका महिलेचा मृतदेह अढळ्याची घटना घडल्याचे समोर आले असून, सदर घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस घटना स्थळी दाखल झाले असून, सदर घटने विषयी कर्जत पोलीस ठाण्यात सदर अज्ञात मृत महिलेच्या खुना विषयी अज्ञात मारेकऱ्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कर्जत तालुक्यातील व कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील मुंबई – पुणे डाऊन मार्गावरील स्टेशन ठाकुरवाडी गावाचे हद्दीतील रेल्वे रूळाचे शेजारीत पोल क्र. ११२ ते ११६ दरम्यान दि. १६ एप्रिल २०२५ रोजी दुपारचे १२.३० वाजण्याचे सुमारास एक ट्रॉलीबॅग मध्ये एका महिलेचा मृतदेह अढळ्याची घटना समोर आली आहे. सदर घटने संदर्भात कर्जत पोलीस ठाण्यात माहिती मिळताच कर्जत उपविभागीय पोलीस आधिकारी धुळा टेले व कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गरड याच्यासह पोलीसांची टीम घटना स्थळी पोहचले असता, सदर महिलेला कोणीतरी अज्ञात इसमानी काही कारणास्तव जिवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने सदर मृत महिलेला एका पिंक रंगाचे ट्रॉलीबॅग मध्ये भरून टाकळ्याचा प्रकार समोर आला आहे.
सदर मृत महिलेचे वय अंदाजे २८ ते ३२ वर्ष असून, तीचे नाव व पत्ता निष्पण झालेला नसुन, अंगाने मजबूत, रंग गृहवर्णीय, केस काळे व लांब, उंची ५ फुट, मृत महिलेचे हात व पाय हिरव्या रंगाचे नायलॉन दोरीने बांधलेले, अंगात लाल रंगाचा गोल गल्याचा टी-शर्ट तसेच पायात पाढऱ्या रंगाची व त्यावर पुलाची नक्षीकाम असलेली पॅन्ट, व मृत महिलेचा चेहरा व डोके काळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीमध्ये बांधल्याचे, गळया भोवती हिरव्या रंगाच्या नायलॉन दोरीने आवळलेले, तसेच कपाळपट्टीवर एका पाढऱ्या रंगाचे कपड्याने बांधल्याचे व डोळे व जीभ बाहेर अर्धवट आलेल्या स्थितित पिंक रंगाचे ट्रॉलीबॅग मध्ये अढळून आली आहे.
सदर प्रकरणी लोणावळा लोहमार्ग महिला पोलीस छाय चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा र. नं. १०३ / २०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१), २३८ प्रमाणे अज्ञात इमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यांचा पुढील तपास हा कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गरड हे त्यांच्या पोलीस टीमसह करीत आहे. मात्र सदर घटनेचे गांभीर्य पहाता या खुनाच्या घटनेची उकल कर्जत पोलीस कशा पद्धतीने करणार या कडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.