कर्जत मध्ये ही बदलापूर घटनेची पुनरावृत्ती
* स्कुल बसच्या क्लिनर कडून दोन चिमुकलींचे लैंगिक शोषण
* क्लिनर विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल.
दिनेश सुतार
कर्जत प्रतिनिधी
9764605917
कर्जत :- सध्या बदलापूर मधील लहान चिमुकलींवर लैंगिक शोषणाचा प्रकार ताजा व राज्यासह देशभरात गाजत असताना, कर्जत पोलीस ठाणे हद्दीत ही बदलापूर सारख्या घटनेची पुनरावृत्ती झाली असून, पाच वय वर्ष असलेल्या दोन पिडित लहान चिमुकलींचे स्कुल बसच्या क्लिनर कडून लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार समोर आला असून, पिडित लहान चिमुकलींच्या पालकांच्या सदर प्रकार लक्षात येताच नराधम स्कूल बसच्या क्लिनर विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माणुसकीला कलंक लागेल असा प्रकार रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाणे हद्दीत प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या पाच वर्षांच्या दोन निरागस लहान चिमुकल्यांवर स्कूल बसमधील विकृत क्लिनरने केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे कर्जत तालुक्यासह संपूर्ण परिसर हदरून गेला आहे. कर्जत तालुक्याती मौजे वदप गावातील राहाणार विकृत करण दीपक पाटील यांनी स्कूल बस मध्येच पिडित दोन लहान चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धकादायक प्रकार समोर आला आहे.
सदर धकादायक प्रकार पिडित चिमुकलींच्या पालकांना समजताच पालकांनी थेट कर्जत पोलीस ठाणे गाठत विकृत स्कूल बसचा क्लिनर करण पाटील यांच्या विरोधात तक्रार दिल्यावरून कर्जत पोलीस ठाण्यात विकृत नराधम स्कूल बसचा क्लिनर करण पाटील यांच्या विरोधात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, विकृत नराधम स्कूल बसचा क्लिनर करण पाटील याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
सदर घटने बाबत विकृत क्लिनर हा पिडित चिमुकलींना धमकावून स्कूल बसमध्ये नेहमी ड्रायव्हरच्या सिट मागील सिटवर पिडित चिमुकलींना मांडीवर बसवत त्यांच्या शरीराला अश्लीलरित्या स्पर्श करत त्यांचे लैंगिक शोषण करत असल्याचा व सदर प्रकार या पिडित चिमुकलींनी घरी न सांगण्यासाठी त्यांच्यावर दाबाव टाकत असल्याचे, तर पिडित एका चिमुकलीला याचा काल त्रास झाला त्या नंतर मेडिकल इश्यू झाल्यावर पालकांनी पिडित चिमुकलीला विचारले असता, सदर प्रकार हा विकृत क्लिनर हा गेले एक वर्षापासून आमच्या सोबत असे प्रकार करत असल्याचे समोर आल्याने आम्ही सदर प्रकारा बद्दल बस मालकाला संपर्क केला असता, उडवाउडवीची उत्तरे देत या संदर्भात माजी जबाबदारी नसल्याचे, तसेच सदर प्रकरणाची तक्रार न देण्यासाठी त्यांच्यावर राजकीय लोकांचा दबाव देखील आला असल्याचे, व सदर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात संध्याकाळचे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान आलो मात्र एफ आर ए कॉपी ही आमच्या हातात रात्री अकरा वाजता आम्हाला देण्यात आल्याचे तसेच सदर प्रकार हा स्कूल बस मधील इतर मुलींच्या बाबती देखील घडला असल्याचे, व या प्रकाराला स्कूल बसचा मालक देखील जबादार असल्याने त्याच्या विरोधात देखील पोलीसांनी कार्यवाही करावी. असे पिडित चिमुकलीच्या पालकांन कडून सांगण्यात येत आहे.