ग्रीन हाउस रिसॉर्ट चे शानदार शुभारंभ

ग्रीन हाउस रिसॉर्ट चे शानदार शुभारंभ

अनंत गोंधळी यांचे संघर्षमय जीवन प्रेरणादायी -आमदार महेंद्र दळवी

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- शिवसेना तालुका प्रमुख अनंत गाेंंधळी यांच्या ग्रीन हाउस रिसॉर्ट चे शानदार शुभारंभ कार्यक्रम गुरूवार दि. 17 एप्रिल 2025 रोजी
संपन्न झाला.
या प्रसंगी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, माजी जि.प.सदस्या मानसीताई दळवी, पनवेलचे आर.सी. घरत, शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी, उपजिल्हा प्रमुख शैलेश चव्हाण, उपजिल्हा प्रमुख भरतशेठ बेलोसे, मुरूड तालुका प्रमुख ॠषीकांत डोंगरीकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सचिव आशिष भट, श्रध्दाताई ठाकूर, योगेश मगर, सुरेश म्हात्रे, संतोष निगडे, नयना घरत, मोनिका पाटील, कामगार नेते राजशेखर, चंद्रकांत पाटील, दिपक रानवडे आदी मान्यवर मंडळीसह खानाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ व अनंत गोंधळी हितचिंतक, आप्त, सगेसोयरे आदीची उपस्थिती होती.
प्रारंभी आमदार महेंद्र दळवी व मानसीताई दळवी यांचे आगमन फटाक्याचे आतषबाजीने करण्यात आले, त्यानंतर ग्रीन हाउस रिसॉर्टचे शानदार शुभारंभ आमदार महेंद्र दळवी, मानसीताई दळवी तसेच अनंत गोंधळी व त्याच्या पत्नी यांचे हस्ते फीत कापून व आमदार महेंद्र दळवी, मानसीताई दळवी, सुरेश म्हात्रे, राजा केणी, आदीच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी आमदार महेंद्र दळवी व मानसीताई दळवी यांचे अनंत गोंधळी कुटूंबियाकडून औक्षण तसेच पुष्पगूच्छ प्रदान करून स्वागत करण्यात आले.
यावेळी अनंत गोंधळी यांचे वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये आमदार महेंद्र दळवी व मानसीताई दळवी तसेच उपस्थित मान्यवर मंडळी यांचे स्वागत व सत्कार अनंत गाेंंधळी यांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर सुरेश म्हात्रे, श्रध्दाताई ठाकूर, आर.सी. घरत आदीने उपस्थितांना संबोधीत केले, तर आमदार महेंद्र दळवी यांनी उपस्थितांना संबोधीत करताना अनंत गोंधळी यांचे संघर्षमय जीवन प्रेरणादायी असल्याचे सांगितले तसेच अनंत गोंधळी यांचे भविष्यात 101 रिसॉर्ट व्हावेत अश्या शुभेछ्या दिल्या. प्रसंगी आमदार महेंद्र दळवी यांनी अनंत गोंधळी व त्यांच्या सौभाग्यवती यांच्या सत्कार शाल,श्रीफळ व पुष्पगूच्छ प्रदान करून केला. शेवटी अनंत गोंधळी यांनी उपस्थितांचे आभार व्यक्‍त केले.